CM Uddhav Thackeray | ‘संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत कारखाने सुरूच ठेवा’ – CM उद्धव ठाकरेंचे निर्देश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Uddhav Thackeray | बीड जिल्ह्यातील हिंगणगाव (Hingangaon) येथील एका शेतकऱ्याने ऊस गाळपास जात नसल्याच्या नैराश्यातून शिल्लक उसाला आग लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते आणि ऊस उत्पादक शेतकरीही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी एवढं टोकाचं पाऊल उचलू नये, असं देखील सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. त्यानंतर ठाकरे सरकारने (Thackeray Government) मोठा निर्णय घेतला आहे.

 

शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण ऊस जाईपर्यंत कारखान्यांमध्ये गाळप सुरूच ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिेले आहेत.
या दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांचे नेतेही राज्य सरकारविरोधी आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे.
त्यानंतर, राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दखल घेण्यात आली आहे. संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने (Sugar Factory) सुरु ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी अतिरिक्त ऊस गाळप अनुदान बैठकीमध्ये दिले आहेत.

या दरम्यान, शेतकऱ्यांच्या हितासाठी दिनांक 1 मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून रुपये 200 प्रती टनप्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णयही घेतला गेला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आता, शेतातील ऊस नक्कीच कारखान्यात जाईल आणि आपलं नुकसान टळेल हीच आशा सर्व शेतकऱ्यांना आहे.

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | great relief continue the factory till the whole sugar cane is crushed cm uddhav thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा