CM ठाकरेंनी दिले ‘लॉकडाउन’चे संकेत; एक-दोन दिवसांत घेऊ शकतात निर्णय !

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  कोरोना (COVID-19) चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील काही भागात लॉकडाउन करण्याचे संकेत दिले आहेत. मुख्य म्हणजे याबाबत एक-दोन दिवसांत निर्णय होईल, असंही त्यांनी सागितलं आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना सीएम ठाकरेंनी याबाबत भाष्य केलं आहे. राज्यात कोरोनाची संख्या आता झपाट्यानं वाढताना दिसत आहे. कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरेंनी भाष्य केलं. त्यांनी पुन्हा लॉकडाउनचे संकेत दिले आहेत. एक-दोन दिवसांतच याचा निर्णय होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.