CM Uddhav Thackeray | ‘बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना काडीचीही किंमत देत नाही’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Uddhav Thackeray | भोंग्याच्या मुद्द्यावरुन (Loudspeaker Row) सध्या राज्यातील राजकारणात मोठी घडामोड होताना दिसत आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत शाब्दिक शीतयुद्ध रंगल्याचे दिसत आहे. यावरुन आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना आपण काडीचीही किंमत देत नाही.’ अशा कणखर शब्दात त्यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बीएसटीच्या (Mumbai BST) एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी याबाबत भाष्य केलं आहे. “ज्यांना अ‍ॅसिडीटी झाली आहे, पोटात आगडोंब उसळला आहे. ज्यांना जळजळतंय मळमळतंय आणखी काय होतंय माहिती नाही. पण त्यांच्या राज्यात त्यांनी मुंबई महापालिकेच्या शाळांचा (BMC School) दर्जा अंगिकारुन दाखवावा, हे माझं उघड आव्हान आहे. पण करायचं काही नाही आणि बिनकामाचे भोंगे वाजवायचे हाच त्यांचा उद्योग आहे, अशा लोकांना मी काडीची किंमत देत नाही” असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- i dont care to those who play useless loudspeaker cm uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil On Thackeray Government | चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘लाथ मारायची आणि साॅरी म्हणायचं…’

 

Sharad Pawar On Amruta Fadnavis | मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवरून पवारांनी अमृता फडणवीसांना फटकारलं; म्हणाले…

 

Pune Crime | धायरीत गुंडांच्या टोळक्याचा हैदोस, तरुणांना कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले; मोटारीच्या काचा फोडून पसरविली दहशत