CM Uddhav Thackeray | ‘अजित पवार यांच्यावर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपवा’; ‘या’ नेत्याची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Uddhav Thackeray | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर काही दिवसांपुर्वी सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया झाली आहे. यामुळे गेली अनेक दिवस ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला आणि अधिवेशनाला अनुपस्थित होते. याच मुद्द्यावरुन भाजप (BJP) ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीका करताना दिसत आहे. नुकतंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटलांनीही (Chandrakant Patil) मुख्यमंत्र्यांच्या मुद्द्यावरून निशाणा साधला होता. यानंतर भाजपचे आमदार निरंजन डावखरे (BJP MLA Niranjan Davkhare) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

निरंजन डावखरे म्हणाले, ”कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढत असताना सर्वच आघाड्यांवर महाराष्ट्रात प्रचंड अनागोंदी माजली असून प्रकृतीच्या कारणामुळे प्रदीर्घ काळ राज्य कारभारापासून दूर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आता तरी राज्याच्या प्रमुखपदाची सूत्रे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) किंवा अन्य सहकाऱ्यांकडे सोपवावीत, आणि राज्याला अनागोंदीपासून वाचवावे अशी मागणी त्यांनी केली. तसेच, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या प्रकृतीस आराम पडावा अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. अजितदादांवर किंवा राष्ट्रवादीवर (NCP) विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे (Aditya Thackeray) कार्यभार सोपवा, पण राज्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री द्या.” असं डावखरे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना निरंजन डावखरे (BJP MLA Niranjan Davkhare) म्हणाले, ”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया झाली, तेव्हापासून पूर्णवेळ मुख्यमंत्री नसल्याने महाराष्ट्र निर्णायकी झाला असून मंत्रिमंडळही भरकटले आहे. अगोदरच कोरोना महामारीचे संकट वाढत असताना कायदा सुव्यवस्था स्थितीही बिघडलीय. बलात्कार, खून, दरोडे, फसवणूक, भ्रष्टाचाराची प्रकरणे दिवसागणिक वाढत असून राज्य दिशाहीन झाल्याचीच ही लक्षणे आहेत. अशा स्थितीत, मुख्यमंत्री मात्र प्रकृतीच्या कारणामुळे दैनंदिन कारभारातही लक्ष घालू शकत नसल्याने राज्याचे अतोनात नुकसान होत आहे. दीर्घकाळ अनुपस्थित असल्यास पदभार अन्य ज्येष्ठ सहकाऱ्याकडे सोपविण्याची प्रथा अमलात आणण्याची हीच ती वेळ असून आता राज्याला अधिक अस्थिरतेकडे ढकलण्याऐवजी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार हस्तांतरित करून ठाकरे यांनी राज्यकारभारात स्थैर्य आणावे.”

 

”मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे अनेक गंभीर प्रश्न टांगणीवर लागले असून संकटे आणि समस्यांनी घेरलेल्या महाराष्ट्रास अधिक काळ निर्णायकी ठेवणे योग्य नाही,” असं देखील निरंजन डावखरे यांनी म्हटंलं आहे. त्याचबरोबर, ”राज्याच्या कानाकोपऱ्यात जनता असंख्य समस्यांचा सामना करत असताना मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर देखील पडू शकत नाहीत, व मंत्रालयापर्यंत जाणेही त्यांना शक्य होत नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनासही ते उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे सरकार दिशाहीन व निर्णायकी झाले आहे. कोरोनास्थितीचा आढावा घेण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी निमंत्रित केलेल्या महत्वपूर्ण दूरसंवाद बैठकीसही ते प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत.
सलग अडीच तास बसणेदेखील त्यांना शक्य नाही अशी कबुली राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनीच दिलेली असल्याने,
उद्धव ठाकरे यांनी पूर्ण विश्रांती घेऊन ठणठणीत बरे व्हावे अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.”

Web Title : CM Uddhav Thackeray | if you dont trust ajit pawar hand over chief ministers post aditya thackeray says niranjan davkhare

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी !
पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे,
‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये;
सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात