CM Uddhav Thackeray | ‘हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावानं मतं मागा’; CM उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Uddhav Thackeray | राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तंग झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीदरम्यान अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ‘हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावानं मतं मागा, आधी नाथ होते आता दास झाले,’ असा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोर आमदारांवर केला आहे.

 

दरम्यान, शिंदे गटांनी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असं नव्या गटाला नाव देण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान शिंदे गटापुढे एक नवा पेच निर्माण झाला आहे. कारण, शिवसेनेकडून राज्य निवडणूक आयोग (State Election Commission) आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला (Central Election Commission) एक पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘बाळासाहेबांचे नाव कोणालाही वापरु देऊ नये.’ त्यामुळे शिवसेना मात्र शिंदे गटाबाबत अधिकच आक्रमक होताना दिसत आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अनेक ठरावाला मंजुरीही देण्यात आली आहे.

 

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील महत्वाचे निर्णय –

निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुखांना (उद्धव ठाकरे), पहिला ठराव पारित.

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही, ठरावाला राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजुरी.

शिवसेनेशी बेईमानी करण्यावर कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिकार ही राष्ट्रीय कार्यकारणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना असतील.

शिवसेनेची मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्वाची बांधिलकी कायम राहिल.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर कार्यकारिणीचा विश्वास, त्यांना पक्षात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार.

शिवसेनेशी गद्दारी कठोर कारवाई करण्याचे अधिकार पक्षप्रमुखांना असेल.

शिवसेना भवनला सर्वांना जमण्याचे आदेश, शिवसेना भवनजवळ शक्तीप्रदर्शन होणार.

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | ‘If you have the courage, ask for votes in the name of your own father’; CM Uddhav Thackeray’s strong attack

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Airtel 365 Days Plan | एक वर्षाच्या व्हॅलिडिटीचा सर्वात स्वस्त प्लान, मिळतील अनलिमिटेड कॉल्स, जाणून घ्या किंमत

 

Pune Crime | तोतया अँटी करप्शनची रेड पोलिसांच्या दक्षतेने टळली; पोलिसांना पाहून बनावट पोलिसांनी ठोकली धुम

 

Cryptocurrency Market | क्रिप्टोकरन्सी मार्केट मागील 3 दिवसांपासून पॉझिटिव्ह, लागोपाठ वाढत आहे इथेरियमचा डॉमिनन्स