CM उद्धव ठाकरे आमदारकीसाठी निवडणार ‘हा’ मार्ग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणतीही निवडणूक न लवढवता मुख्यंत्री झाले आहेत. कोणतीही विधानसभा निवडणूक न लढवताच ते आता विधानपरिषदेचे सदस्य होण्याची शक्यता आहे. एका वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे. विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी त्यांच्याकडे 6 महिन्यांचा कालावधी आहे.

एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, “एप्रिलमध्ये विधानपरिषदेच्या अनेक जागा रिक्त होणार आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरे निवडणूक लढवतील. विधानपरिषदेचे सदस्य विभानसभेच्या आमदारांमधून निवडले जातात. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विधानसभेत पुरेसं संख्याबळ आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे बिनविरोध निवडून येतील.” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी माहिती सांगितलं की, “धनंजय मुंडेंनी विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर विधानपरिषदेची जागा रिक्त झाली. त्यामुळे याच जागेवरून उद्धव ठाकरे विधानपरिषदेची निवडणूक लढवतील अशी शक्यता होती. मुंडेंचा विधानपरिषदेतील कार्यकाळ जुलै 2020 मध्ये संपणार आहे. त्यामुळे उद्धव यांनी ती जागा लढवल्यास त्यांचा कार्यकाळ पुढील अडीच वर्षात संपेल. तंस झाल्यास त्यांना पुन्हा एकदा निवडणूक लढवावी लागेल. त्यामुळेच एप्रिलमध्ये विधानपरिषद लढवून 6 वर्ष विधानपरिषदेवर राहण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी सुरू केली आहे. महाविकासआघाडी सरकारचा कार्यकाळ 2024 मध्ये संपणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे एप्रिलमध्ये विधानपरिषद लढवतील आणि 2026 पर्यंत विधानपरिषदेचे सदस्य राहतील.” अशी माहिती त्यांनी दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/