CM Uddhav Thackeray | ‘ज्यांना जायचं आहे त्यांनी जा…’, वर्षा निवासस्थान सोडताना उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे यांनी बंड (Eknath Shinde Revolt) पुकारल्यानंतर शिवसेनेचे आमदार (Shivsena MLA) त्यांना जाऊन मिळत आहेत. शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार (Thackeray Government) अल्पमतात आले आहे. राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदारांना फेसबुक लाईव्हच्या भावनीक आवाहन केलं. यावेळी त्यांनी आपण ‘वर्षा’ हा बंगला आजच सोडून ‘मातोश्री’वर जाणार असल्याचे सांगितले. वर्षावरुन निघताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी ‘ज्यांना जायचे आहे त्यांनी जा…’ असं भावनिक वक्तव्य केलं.

 

ज्यांना जायचं आहे त्यांनी जा… असं भावनिक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. वर्षा वरुन मातोश्री (Matoshri) कडे जाताना त्यांनी असं बोलले आणि निघून गेले. यावेळी उद्धव ठाकरे भावूक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या संघर्षाला आता भावनिक रुप आल्याचं पहायला मिळतंय.

 

तिकडून काय सांगता, तोंडावर सांगा, मी राजीनामा (Resignation) देण्यास तयार आहे,
असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांनी फेसबुक लाईव्हच्या (facebook Live) माध्यमातून बंडखोर आमदार तसेच जनतेशी संवाद साधला.
तुम्ही इकडे या… आणि मला सांगा, मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही लायक नाही, मी लगेच राजीनामा देतो,
अस उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला वर्षा बंगला आजच सोडणार असल्याचं जाहीर केलं.
त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडलं. उद्धव ठाकरे यांच्या भावनिक भाषणावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देणार नाही, अशी माहिती मिळत आहे.

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | maharashtra political crisis cm uddhav thackeray got emotional on eknath shinde rebel

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC | 8 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीत मिळवा 50 लाखापेक्षा जास्त रिटर्न, फायद्याचा सौदा आहे LIC चा ‘हा’ प्लान

 

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाच्या 34 आमदारांचं विधानसभा उपाध्यक्षांना पत्र, जाणून घ्या

 

Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदेंचं उत्तर; म्हणाले…