नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा सावरकरांच्या तत्वांविरोधी : मुख्यमंत्री

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरात उद्यापासून (सोमवार, 16 डिसेंबर) सुरू होतंय. हे अधिवेशन आठवडाभर चालणार आहे. या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आज नागपुरात आगमन झालं. मुख्यमंत्री म्हणून ठाकरे हे पहिल्यांदाच नागपुरमध्ये आले आहेत. नागपूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून भाजपला टोला लगावाला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा सावरकरांच्या तत्वाविरोधी असल्याचे सांगत सावरकरांबद्दल काल जी भूमिका होती ती कायम राहिल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज जागतिक चहा दिवस आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान यांची पार्श्वभूमी संपूर्ण देशाला माहित आहे. चहा विक्रेता देशाचा पंतप्रधान झाला. मात्र, त्यांच्याच पक्षाचे नेते चहापाण्यावर बहिष्कार टाकत असल्याची टीका त्यांनी केली. त्यामुळे आणखी एक पोटकथा झाली आहे ती म्हणजे विरोधकांकडून बहिष्कार टाकणे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून प्रचार केला. शेतकऱ्यांना कर्ज मुक्त नाही तर चिंता मुक्त करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. तसेच शिवस्मारकात घोटाळा झाला असेल तर सरकार म्हणून योग्य ती कारवाई करू असे सांगत जगाला हेवा वाटेल असं शिवस्मारक उभे करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/