मुख्यमंत्री ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले – ‘…तोपर्यंत ही महाविकास आघाडी टिकणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार (Government) आल्यानंतर विरोधकांनी हे सरकार फारकाळ टिकणार नाही अशी भविष्यवाणी केली. तर भाजपचे काही नेते हे सरकार कधी कोसळणार याचे मुहूर्त देखील सांगत होते. यासंदर्भात खुद्द शिवसेना (Shivsena) प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आपली भूमिका मांडली आहे. जशी युती टिकली, तशी आघाडी (Mahavikas Aghadi) टीकेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

तीन वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्यामुळे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी अटकळ बांधली जात होती.
यासंदर्भात एका वृत्तपत्राच्या दूरसंवादमालेमध्ये मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
यावर बोलताना त्यांनी महाविकास आघाडी संदर्भात आपली भूमिका मांडली.

तीन पक्षांचे सरकार ही अकल्पित घटना
यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, तीन पक्षांचं सरकार कधी येऊ शकेल, हा माझ्या मनातील विचार नव्हता.
अकल्पित असं घडलं किंवा घडवावं लागलं.
यानंतर दुसरं अकल्पित घडलं ते म्हणजे कोरोनाचं.
यामुळे मंत्रिमंडळाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांना भेटतो.
परंतु तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही पोहचू शकत नाही.
ऑनलाइन पद्धतीनेच कार्यकर्त्यांच्या बैठका होत आहेत, असे ठाकरे म्हणाले.

युती किंवा आघाडी चांगल्या कामासाठी
राज्यातील महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) किती काळ एकत्र राहील?
या प्रश्नावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले,
युती किंवा आघाडी चांगल्या कामासाठी असेल,
तर पुढच्या कित्येक वर्षांसाठी जशी काम होतील तशी आघाडी टिकवू शकतो.
जशी युती टिकली, तशीच आघाडीही टिकेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला.

तोपर्यंत आघाडी टिकणार
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, जोपर्यंत आमच्या तिघांच्या मनातला हेतू स्वच्छ आणि प्रमाणिक असले, तोपर्यंत आघाडी टिकायला काय हरकत आहे ?
आमच्यात कुरबुरी असल्या, तर सरकार वर्ष-दीड वर्ष चाललं नसतं.
सरकारचे काम सुरु झाले तेव्हा सर्वांमध्ये नवखा मुख्यमंत्रीच होता.
या सर्व लोकांचं मला सहकार्य लाभत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

भाजपसोबत युती तोडण्याची इच्छा नव्हती
भाजपसोबत असलेली युती तुटली यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली, आम्ही जे काही केलं ते प्रामाणिकपणे केलं. भाजपसोबत देखील आमची युती 25 ते 30 वर्ष होती. तोंडदेखलं काही असेल तर ते योग्य नाही. आम्ही एका ध्येयाने एकत्र राहिलो. आमची युतीमधून बाहेर पडण्याची इच्छा नव्हती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पंतप्रधानांसोबत वैयक्तिक नातेसंबंध
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्याशी आमचे कौटुंबिक नातेसंबंध होते. पंतप्रधानांशी देखील जे आमचे वैयक्तिक नातेसंबंध आहेत, ते लावण्याचे कारण काय ? राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवावे. वैयक्तिक संबंध वेगळे ठेवावे लागतात, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.