मराठा आरक्षण : आता सगळं तुमच्या हाती, 370 कलम हटवताना दाखवलीत तीच हिंमत यासाठी दाखवावी – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारला लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

ज्या प्रमाणे काश्मीरमधील कलम 370 हटवताना तुम्ही तत्परता दाखवली तशीच तत्परता आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दाखवा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आपण उद्या केंद्र सरकारला पत्र लिहून मागणी करणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच मराठा आरक्षणासाठी दिल्लीत जाऊन भेटण्याची आवश्यकता असेल तर ते सुद्धा करु असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

– 370 कलम हटवताना जी हिंमत दाखवली तीच हिंमत मराठा आरक्षणाच्या संदर्भात दाखवा
– आरक्षणाचा अधिकार केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना असल्याचे न्यायालयाने सांगितले
– मराठा समाजाने संयमाने भूमिका घेतली
– पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना हात जोडून विनंती त्यांनीच आता निर्णय घ्यावा
– न्यायालयाने निकाल देताना पुढचा मार्गही दाखवला
– आरक्षणाची लाढाई अद्याप संपलेली नाही
– छत्रपती संभाजीराजे यांनी देखील अत्यंत समंजसपणा दाखवत आपली प्रतिक्रिया दिली
– सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मराठा समाजाने शांतपणे स्वीकारला
– ज्या वकिलांनी उच्च न्यायालयात न्याय मिळवून दिला त्याच वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली
– येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार
– तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी महाराष्ट्राची तयारी
– लस पुरवठा वाढला की लसीकरणाचा वेग वाढणार
– 12 कोटी डोस एक रक्कमी घेण्याची राज्याची तयारी
– 1800 टन मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती राज्यातच करणार
– 1700 मेट्रिक टन ऑक्सिजनची दररोज आवश्यकता
– गाफील राहु नका, महाराष्ट्र अद्यापही धोक्याच्या वळणावर
– रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेत वाढ
– 1 लाख ऑक्सिजन बेड्स आहेत
– देशात तिसऱ्या लाटेची भीती
– आयसोलेशन बेड्सची संख्या 6.5 लाखांवर नेली
– महाराष्ट्रात रुग्णवाढ मंदावत आहे
– कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचं सुप्रीम कोर्टाने सुद्धा कौतुक केलं
– कोरोना लढ्यात आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता