तुम्ही तुकाराम मुंढेंच्या सोबत आहात ? CM उद्धव ठाकरे म्हणाले….

पोलिसनामा ऑनलाईन – नागपूरमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि सत्ताधार्‍यांमध्ये सतत संघर्ष होत आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नेते हे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर सतत आरोप करत आहेत. या संघर्षात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची काय भूमिका आहे, असा प्रश्न विचारला जात होता. याबाबत आता उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.

तुकाराम मुंढे आल्यापासून तिथे शिस्त लागली आहे. मग मी कोणाच्या मागे उभे राहिले पाहिजे. मी शिस्तीच्याच मागे उभा आहे,’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी तुकाराम मुंढेंची पाठराखण केली आहे.’कठोरपणाचा तुम्ही लोकांच्या हितासाठी उपयोग करून घेत असाल तर वाईट काय? त्या वेळी त्यांनी काही नियम, काही कायदे कडकपणाने अमलात आणवले हे काही जणांना परवडत नसेल. पण तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अमलात आणली तर अशा अधिकाऱयाच्या पाठी सर्वांनी उभे राहायला पाहिजे. आततायीपणा कोणीच करू नये, शिस्त लावली जात असेल आणि जनतेचे हित जोपासले जात असेल तर चांगले आहे. शेवटी जनतासुद्धा उघडया डोळयांनी हे बघत असेल. त्यांच्या तोंडावर मास्क असला तरी जनतेचे डोळे उघडे आहेत हे विसरून चालणार नाही. हा महाराष्ट्र आहे, त्याचा धृतराष्ट्र अजून झालेला नाही आणि होऊ शकत नाही,’ असे म्हणत त्यांनी मुंडे यांची पाठराखण केली.