CM Uddhav Thackeray-Sharad Pawar | एसटी कामगारांच्या आंदोलनानंतर CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना ‘काॅल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Uddhav Thackeray-Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक (Silver Oak) या निवासस्थानी आज दुपारी एसटी कामगारांनी गोंधळ (ST Employees Protest) घातला आहे. एसटी कामगार (MSRTC Worker) पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसत आहे. त्यावेळी शरद पवार यांच्या घराच्या आवारात एसटी कामगारांनी दगड, चप्पल फेक देखील केली आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शरद पवारांना दुरध्वनीवरुन संपर्क साधला असल्याची माहिती समोर आली आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.
शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्यासंदर्भात चर्चा केली आहे.
त्याचबरोबर कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या सुरक्षितते संदर्भात देखील चर्चा केल्याची माहिती मिळत आहे,
मुख्यमंत्री ठाकरे यांनी शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्याची गंभीर दखल घेत त्याबाबत
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) आणि
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai CP Sanjay Pandey) यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी फोनवरून चर्चा केली आहे. (CM Uddhav Thackeray-Sharad Pawar)

 

 

दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या घरावर झालेल्या
हल्ला प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत गृहविभाग (Home Department)
आणि मुंबई पोलिसांना (Mumbai Police) संपुर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले असल्याचे समजते.

 

Advt.

Web Title :- CM Uddhav Thackeray-Sharad Pawar | cm uddhav thackeray call to sharad pawar after st employees protest on silver oak in mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा