शिवसेनेनं काय भूमिका घ्यावी हे कोणी शिकवू नये : CM उद्धव ठाकरे

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला सोमवारी लोकसभेत शिवसेनेने पाठिंबा दर्शविला असून त्याबाबत काँग्रेस च्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु शिवसेनेने आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. त्यामुळे शिवसेनेनं काय भूमिका घ्यावी हे कोणीही शिवसेनेला शिकवू नये. अशा स्पष्ट शब्दात उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाबाबत जोवर स्पष्टता येणार नाही, तोवर त्याला पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. हे विधेयक देशहितासंबंधी असल्याने विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान शिवसेनेने केले असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले.

यावर भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी सांगितले की, सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं मतदान करणं ही देशभक्ती असते आणि त्यांच्या विरोधात मतदान करणं हा देशद्रोह असतो, सर्वात आधी ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. या सर्वांपेक्षा देशात राहणाऱ्या जनतेसमोर रोजमितीला भेडसावणारे रोजच्या जीवनातील आवश्यक प्रश्न सोडवणे अधिक महत्त्वाचे असते. या सगळ्यांचा विचार करून शिवसेना कुठलेही पाऊल उचलते आणि आम्ही काय भूमिका घ्यावी, हे आम्हाला कोणी सांगू नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच उद्धव ठाकरे म्हणाले की, नागरिकत्व दुरूस्ती विधेयक हे देशहितासाठी असल्याने त्याच्या बाजूने आम्ही उभे राहू परंतु जे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले त्याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या विधेयकातून शेजारील देशांना इशारा देणे आवश्यक आहे कारण अल्पसंख्यांकांवर होणारे अन्यायाबाबत त्यांनी योग्य भूमिका घ्यावी. परंतु तसे होताना दिसत नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान महाविकास आघाडीच्या एकसूत्रीचं शिवसेनेनं उल्लंघन केले आहे अशी चर्चा होत आहे कारण शिवसेनेनं किमान अलिप्ततेची भूमिका घ्यायला हवी होती असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. आता हे प्रकरण चांगलेच चिगळले असून पुढे कोणते वळण घेते हे पाहणे महत्वाचे आहे. दरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की आमच्यासारखे सर्चच पक्ष देशहित डोळ्यासमोर ठेवूनच काम करतील. तसेच राज्यसभेत हे विधेयक मांडलं जाण्यापूर्वी त्यामध्ये सुचवलेल्या सुचनांची दखल घेणं आवश्यक असल्याचं आहे असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकत्व सुधारणा विधेयक हे बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीयत्वाला धरुन असल्याने शिवसेनेने याला पाठींबा दिला आहे,” असे अरविंद सावंत म्हणाले.Visit : Policenama.com
उसाचा रस पिताना घ्या काळजी, ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
‘माऊथवॉश’ वापरत असाल तर वेळीच व्हा सावध ! ‘हे’ आहेत ३ धोके
‘ही’ आहेत अस्थमा आजाराची १० कारणे, जाणून घ्या याची ५ लक्षणे
‘ही’ फॅशन महिलांना पडू शकते महागात ! होऊ शकतात ‘या’ ५ समस्या
‘थंड दूध’ पिण्याने वाढते सौंदर्य ! ‘हे’ ५ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
प्रोटीन्सचा खजिना आहे ‘डाळ-भात’ ! रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ ५ फायदे
बटाट्याच्या रसाचे हे ६ आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क ! जाणून घ्या
मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे
अर्धशिशीच्या समस्येची ‘ही’ आहेत ९ कारणे, अशी घ्या काळजी, करा हा उपाय
तु ‘चीज’ बडी है मस्त-मस्त ! हाडे होतील मजबूत, हे आहेत ५ आरोग्यदायी फायदे

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like