CM Uddhav Thackeray | एकनाथ शिंदे माझं ऐकतील… मला विश्वास आहे! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena leader Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर आज संध्याकाळी शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व आमदार (MLA) आणि खासदार (MP) यांच्यासोबत मनमोकळेपणाने चर्चा केली. आपण एकनाथ शिंदे यांना समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. एकनाथ शिंदे माझे ऐकतील मला विश्वास आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना भाजपसोबत (BJP) जुळवून घ्या, अशी विनंती केली आहे. पण भाजपसोबत कसं जायचं? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी उपस्थित आमदारासमोर केला.

 

काय म्हणाले मुख्यमंत्री?
तुमचं काही नाही, माझं काही नाही तर जायचं कशाला? आता बोलत आहेत की, भाजपसोबत चला… जेव्हा भाजपसोबत होतो तेव्हा आपल्याला कमी त्रास झाला का? मग आता भाजपसोबत कसं जायचं? आपण एकनाथ शिंदेंना समजवण्याचा प्रयत्न करत आहोत. ते माझं ऐकतील हा मला पूर्ण विश्वास आहे. ते लवकरच आपल्यामध्ये असतील. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) आपल्यासोबत आहेत, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) व्यक्त केला.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे यांनी तुम्ही तुमचं ठरवा, मी माझं ठरवतो असं संतापून म्हणाले. एकीकडे चर्चा, दुसरीकडे अपहरणाचा आरोप, तिसरीकडे गटनेते पदावरून (Group Leader) काढलं असं का केलं?यावेळी शिंदे म्हणाले, मी कुठलाही गट अथवा पक्ष स्थापन केलेला नाही.
कुठेही मुख्यमंत्रिपदाबाबत बोललो नाही मग गटनेते पदावरून काढलं का?
संजय राऊत (Sanjay Raut) माझ्याशी फोनवर चांगले बोलतात आणि वारंवार प्रसारमाध्यमांसमोर माझ्याविरोधात बोलतायेत.
भूमिका मांडायची मग मुंबईत या असं बोलतायेत.
मग प्रसारमाध्यमांमध्ये वेगळं का बोलतात असा सवाल करत त्यांनी संजय राऊत यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली.

 

Web Title :-  CM Uddhav Thackeray | shivsena chief cm uddhav thackeray reaction on eknath shinde during meet with shiv sena mp and mlas in mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Purandar Upsa Irrigation Scheme | पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनचे काम केवळ 40 दिवसात पूर्ण

 

Eknath Shinde | भाजपसोबत युती करणं काळाची गरज, एकनाथ शिंदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; दोन नेत्यांमध्ये फोनवर संवाद

 

Maharashtra Political Crisis | ‘आमदारांना किडनॅप करुन सुरतला नेलं’- संजय राऊत