Homeताज्या बातम्याCM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी पायी तिरुपतीला जाणाऱ्या बीडच्या शिवसैनिकाचा...

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी पायी तिरुपतीला जाणाऱ्या बीडच्या शिवसैनिकाचा वाटेत मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर काही दिवसांपूर्वी मानेची शस्त्रक्रिया (Neck Surgery) पार पडली. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांनी कामकाजास ही सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर ज्यावेळी उपचार सुरु होते. त्यावेळी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शिवसैनिकांकडून सातत्याने प्रार्थना करण्यात येत होत्या.

 

दरम्यान बीडच्या एका कट्टर शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) दीर्घायुष्यासाठी तिरुपती बालाजीला (Tirupati Balaji) साकडं घालण्यासाठी बीड (Beed) ते तिरुपती पर्यंत पायी जाण्याचा निर्धार केला होता. पण दुर्दैवाने त्यांचा हा निर्धार पूर्ण होऊ शकला नाही. तिरुपतीला पोहोचण्याआधीच प्रकृती बिघडल्याने त्यांचे निधन (Death) झाले. बीडचे माजी नगरसेवक सुमंत रुईकर Former corporator Sumant Ruikar (वय – 47) असे या कट्टर शिवसैनिकाचे नाव आहे.

बीडपासून रुईकर यांनी आपला पायी प्रवास सुरु केला. तेलंगणा (Telangana) राज्यात पोहोचले. परंतु, तिरुपतीला पोहोचण्याआधीच त्यांची प्रकृती बिघडली. नजीकच असणाऱ्या एका रुग्णालयात स्थानिकांनी त्यांना दाखल केले. पण त्यांच्या शरीराने उपचाराला साथ दिली नसल्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांचा तिरुपतीला जाण्याचा निर्धार पूर्ण होऊ शकला नाही.

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | shivsena worker died while going tirupati for uddhav thackeray helth recovery long life

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Lip Care In Winter | हिवाळ्यात ‘या’ घरगुती पध्दतीनं घ्या ओठांची काळजी, फाटण्याची तर अजिबातच भिती नाही; जाणून घ्या

Phone Tapping Case | फोन टॅपिंग प्रकरण! देवेंद्र फडणवीसच मुख्य साक्षीदार; राज्य सरकारचा न्यायालयात दावा

Water Drinking Habits | पाणी पिण्याने सुद्धा होऊ शकते का नुकसान? केव्हा, कसे आणि का जाणून घ्या 5 योग्य पध्दती

Pune Crime | पुणे ग्रामीणची मोठी कारवाई ! यवत पोलिसांकडून पाटस परिसरात 50 लाखांच्या गांजासह 7 पुरुष आणि 5 महिलांना अटक

NPS Traders | राष्ट्रीय पेन्शन योजना देते छोट्या व्यापार्‍यांना वृद्धत्वात पेन्शनचा आधार, जाणून घ्या सरकारी योजनेचा कसा घ्यायचा लाभ

Pune Crime | क्लिप पाहून 12 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणार्‍या 5 जणांकडून 15 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार; पुण्यातील घटना

Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘पोलिस अधिकार्‍यांसह जयंत पाटील आणि पवार कुटुंबियांकडून माझ्या हत्येचा कट’ (व्हिडीओ)

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News