Corona Vaccine : राज्याला 20 कोटी लशींची आवश्यकता, CM उध्दव ठाकरेंनी केली अदर पुनावालांशी चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने देशात १८ वर्षावरील सर्वाना १ मे पासून लसीकरणाचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने आता महाविकास आघाडी सरकारने पुण्यातील सीरम इन्सिट्यूटकडून कोव्हीशिल्ड (Coveshield) लस घेण्यासाठी खटाटोप सुरु केला आहे. यावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांच्याशी सवांद साधला असल्याचे समजते.

महाराष्ट्र राज्याला वीस कोटी लसींची आवश्यकता आहे. तसेच नुकतेच केंद्र सरकरने १८ वर्षावरील सर्वाना लस जाहीर करताच आणखी जाडा ५.५ इतक्या कोटीची लसीची आवश्यकता निर्माण झालीय. या मुद्यावरून मुख्यमंत्री ठाकरे यांनी सीईओ अदर पुनावाला यांच्याशी महत्वपूर्ण चर्चा केली आहे. लसीबाबत चर्चा झाल्याने आता सीरम इन्सिट्यूटकडून महाराष्ट्र राज्याला लसीचा किती पुरवठा होतो याकडे लक्ष असणार आहे. तर लसीच्या तुटवड्यामुळे राज्यात लस केंद्रे बंद पडली. तसेच केंद्राने सध्या घेतलेल्या निर्णयावरून कंपनीशी बोलून राज्याने ५० लसीचा साथ विकत घेणे असे म्हटले गेले आहे.

दरम्यान, केंद्राने दुरावा केल्याचं वारंवार राज्य शासन आरोप करत म्हणत असत. सध्या १८ वर्षावरील लस साठी मुभा दिल्याने केंद्राने आता ५० टक्के लसीचा साथ कंपनीकडून विकत घेण्यास म्हटले आहे. म्हणून आता राज्यांना कोव्हीशिल्डचे उत्पादन करणारी सिरम आणि कोव्हॅक्सिन लस तयार करणाऱ्या भारत बायोटेकशी प्रत्यक्ष चर्चा करावी लागणार आहे. या दरम्यान, सिरमच्या अदर पुनावालांशी संपर्क साधून लस पुरवण्याची मागणी केली. तेव्हा अदर पुनावाला यांनी २४ मे सिरममध्ये उत्पादित होणाऱ्या लसी केंद्राने आधीच बूक करून ठेवल्याचे म्हटले, म्हणून महाराष्ट्राला सिरम इन्स्टिट्यूटकडून प्रत्यक्ष लसी घेण्यासाठी अजून महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.