… म्हणून हजारो कोटींची कामे झाली, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरु असलेली कुरघोडी सर्वश्रुत आहे. असा कोणताही मुद्दा नाही कि ज्यावरून दोन्ही पक्षांनी एकमेवर आरोप केले नाही. कोरोना संकट काळात तर भाजपने मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडत नाही. घरातूनच करभार पाहतात, असे पहिलेच मुख्यमंत्री आहेत असा आरोप केला होता. त्याला मुखमंत्र्यांनी कधीही उत्तर दिले नाही. मात्र औरंगाबाद येथील विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी त्यांनी विरोधकांचा संचार घेतला आहे. होय, मी घरी बसून काम करीत होतो. मीच नागरिकांना घरी राहा, सुरक्षित राहा, असा सल्ला दिला होता. घरी बसून काम केल्यामुळे आज हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन होत आहे,” असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.

गरवारे क्रीडा संकुलावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री सुभाष देसाई, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे आभासी पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. १७४ कोटींचे सफारी पार्क, १५२ कोटींच्या रस्त्यांची कामे, २५ कोटी रुपये खर्चाच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे भूमिपूजनसुद्धा रिमोट दाबून करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शहराशी अतूट नाते होते. हे नाते अधिक मजबूत करण्यासाठी मी आलोय. पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे शिष्य श्रीखंड्या यांनी कावडीमधून पाणी आणून हौद भरला होता. औरंगाबादेतील लाखो नागरिकांची तहान भागविण्यासाठी मी श्रीखंड्या होण्यासही तयार असल्याचे त्यांनी नमूद केले.