CM Uddhav Thackeray | … तर दुसरी लाटच उलटू शकते, मुख्यमंत्र्यांचा गर्दी करणाऱ्यांना इशारा; सांगितला डेल्टा आणि डेल्टा प्लसचा धोका (व्हिडिओ)

मुंबई न्यूज (Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (Corona second wave) राज्यात थैमान घातलं होतं. अचानक उद्रेक झाल्यानं राज्यात (Maharashtra) दुसऱ्या लाटेच्या काळात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. परंतु आता दुसरी लाट (second wave) हळूहळू ओसरू लागली आहे. असं असलं, तरी डेल्टा प्लस (Delta Plus) या नव्या कोरोना विषाणुमुळे (new corona virus) तिसरी लाट (third wave) येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने (State Government) निर्बंध (Restrictions) वाढवले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी वाढत्या गर्दीबद्दल (crowd) चिंता व्यक्त केली आहे. तारेवरची कसरत करत दुसरी लाट (second wave) थोपवली. खाली आणली. मात्र, दुसरी लाट ओसरली नाही. पण पुन्हा गर्दी होऊ लागली आहे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी गर्दी करणाऱ्यांना धोक्याचा इशारा दिला. CM Uddhav Thackeray | then another wave could break out cm uddhav thackeray said threat delta and delta plus

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

नागरिकांनी गर्दी करु नये

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मालाड (Malad) येथील कोविड सेंटरचे उद्घाटन (Inauguration of Covid Center) झाले.
त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री (CM) म्हणाले, कोरोनाचा (Corona) अद्याप धोका टळला असतानाच आता डेल्टा प्लस व्हायरसमुळे (Delta plus virus) राज्यात आजपासून पुन्हा कडक निर्बंध (Strict restrictions) लागू करण्यात आले आहेत.
यावेळी बोलताना त्यांनी होणाऱ्या गर्दीवर चिंता व्यक्त करुन नागरिकांनी गर्दी करु नये असे आवाहन केले. तसेच आपण गर्दी टाळली नाही, तर दुसरीच लाट (second wave) पुन्हा उलटू शकते, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे.

 

अद्याप दुसरी लाट (Corona second wave) ओसरली नाही

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Corona second wave) आपण सर्वांनी सामना केलात.
आता आणखी खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी (CM) सूचवले आहे. औषधाची (medicine) कमतरता, ऑक्सिजनची (oxygen) कमतरता अशी तारेवरची कसरत करत दुसरी लाट ओसरली आहे.
परंतु, अद्यापही दुसरी लाट संपलेली नाही, ओसरली असली तरी ती एका जागी स्थिरावली आहे.
ज्याप्रमाणे गर्दी होतेय, हे पाहता तिसरी लाट (third wave) कधी येईल हे माहिती नाही.
पण, धोका दुसरी लाट उलटेल का याचाच आहे, कारण जो विषाणू (Virus) आहे दुसऱ्या लाटेचा त्याला डेल्टा (Delta) म्हणतात.
तर आता जो नवीन विषाणू सापडला (new virus was found) आहे,
त्याला डेल्टा प्लस (Delta plus virus) असे म्हणतात. डेल्टा प्लस अजून पसरलेला नाही,
पण डेल्टाच राज्यात व देशात आपल्यावर हावी आहे,
असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Web Title : CM Uddhav Thackeray | then another wave could break out cm uddhav thackeray said threat delta and delta plus

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MP Supriya Sule | पुणे मनपाला दिलेला 200 कोटींचा निधी गेला कुठे? त्याची ED, CBI चौकशी करा