CM Uddhav Thackeray | दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढविण्याबाबत आज आदेश काढणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सांगली न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   राज्यातील दुकानांच्या वेळा आणखी 4 तासाने वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार असून त्याबाबतचा आदेश आज काढण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिली आहे. मात्र, ज्या शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा कमी आहे, त्याच ठिकाणी दुकानांच्या वेळा वाढवून मिळणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केलं आहे. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे हे सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. (Shops will be open until 8 p.m.)

सध्या पूर्ण जिल्ह्यात सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंतच दुकाने सुरू आहेत.
दुपारी 4 पर्यंत बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने दुकानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी व्यापारी आणि दुकानदारांकडून होत होती.
त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले असता त्यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सांगली पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते.
त्यावेळी त्यांनी माध्यमांशी सवांद साधतेवेळी याबाबत माहिती दिली आहे.

 

त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या कमी असेल त्या ठिकाणी दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
ज्या जिल्ह्यांमध्ये रूग्ण वाढ कमी होत नाही.
त्या जिल्ह्यात मात्र हे निर्बंध असेच राहतील. त्यामुळे काही गोष्टींमध्ये शिथिलता जिथे करणं शक्य आहे, तिथे आम्ही करतो आहोत.
जिथे करणं थोडसं अवघड आहे, तिथल्या नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत देणं सुरू झालंय, कायमस्वरूपी तोडगा करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील.
लाखो लोकांचं स्थलांतर करण्यात प्रशासनाला यश आलं आहे. कमी कालावधीत अधिक पाऊस पडल्याने आपत्ती ओढावली आहे
काही वस्त्यांचं पुनर्वसन आवश्यक, नागरिकांनी यामध्ये सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे.
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे.
हजारो कुटुंबांना फटका बसला आहे, या संकटातून मार्ग काढणारचं, असा विश्वास देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title : CM Uddhav Thackeray | tough decisions will have to be taken to find a permanent solution chief minister uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Crime | ‘मी बाहेर आल्यावर सोडणार नाही, पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस चौकीत धमकी’

Pooja chavan Suicide Case | पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला महत्त्वाचा पुरावा, संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ?

Mumbai Local | वकिलांचा फ्रंट लाईन वर्करमध्ये समावेश, वकिलांना लोकल प्रवासाची मुभा; राज्य सरकारची हायकोर्टात माहिती