ठाकरे सरकारचा ‘प्रस्थापित’ सनदी अधिकार्‍यांना दणका, राज्यातील IAS ऑफिसरच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे सरकारने प्रस्थापित सनदी अधिकार्‍यांना दणका दिला आहे. सनदी अधिकार्‍यांच्या मोठया प्रमाणावर बदल्या केल्यानंतर आता आज (गुरूवार) पुन्हा एकदा काही अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकार्‍यांची नावे आणि त्यांची पदस्थापना खालील प्रमाणे आहे.

1. श्रीमती मनीषा पाटणकर – म्हैसकर (प्रधान सचिव नगर विकास विभाग यांची नियुक्ती प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचारअधिकारी)

2. श्रीमती जयश्री भोज (व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक यांची नियुक्ती अतिरिक्त महापालिका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई)

3. एम. डी. पाठक (प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा यांची नियुक्ती प्रधान सचिव नगर विकास-2 या पदावर)

4. डी. एम. मुगळीकर (मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी परभणी या पदावर)

5. डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी (यांची नियुक्ती महापालिका आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण या पदावर कल्याण या पदावर)

6. सचिंद्र प्रताप सिंह (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे यांची नियुक्ती आयुक्त पशुसंवर्धन पुणे या पदावर)

7. सी.के. डांगे (सचिव सामान्य प्रशासन विभाग यांची नियुक्ती महापालिका आयुक्त मिरा भाईंदर महानगरपालिका या पदावर)

8. एम. देवेंद्र सिंह (महापालिका आयुक्त, लातूर यांची यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून)

9. सिवा संकर यांची नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

You might also like