‘या’ वाक्यावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ‘सोशल’वर झाले ‘ट्रोल’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले काही दिवस महाराष्ट्रातल्या जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. संवाद साधत असताना त्यांनी केलेले एक विधान सोशल मीडियावर चांगलेच चर्चेचा विषय बनला आहे. आमची तयारी आहे कोरोनासोबत जगायची पण कोरोनाची तयारी आहे का आम्हाला त्यासोबत जगून द्यायची, असे वक्तव्य ठाकरे यांनी केले होते.

सोशल मीडियामध्ये ठाकरे यांच्यावर जोरदार ट्रोल झाले आहे. याच विधानावरून भाजप मनसेकडून ठाकरेंवर टीका करण्यात येत आहे. मनसेचे संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना नेमके म्हणायचे तरी काय अशा शब्दात टीका केली आहे. माजी कॅबिनेट मंत्री संजय कुटे, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा, भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील ठाकरे यांच्या या विधानावरून जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेच्या विधानावरून सोशल मीडियावर वेगवेगळे मिम्स देखील तयार झाले असून त्या माध्यमातून ठाकरे यांची चेष्ठा उडवली जात आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या सोशल मीडिया विंगदेखील जोरदार सक्रिय झाले आहे.

भाजपा ही सोशल मिडीयावरील पार्टी आहे. महाविकास आघाडी सरकार आणि सीएम काम करतात त्यांना आवडत नाही. भाजपा विनाकारण टीका करत आहे सीएम यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न असला तरी सीएम आणि महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत असल्याचे शिवसेना प्रवक्त्या मनिषा कांयदे म्हणाल्या आहेत.

सोशल मीडियामध्ये याच विधानावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर मिम्स देखील तयार केले गेले आहेत. सार्वजनिकरित्या सोशल मीडियावर त्यावरुन देखील जोरदार चर्चा रंगली आहे. एकूणच काय राज्य संकटात असताना शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात जोरदार टीका टिपण्णी सोशल मीडियामध्ये करताना दिसत आहे.