‘शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा’, CM उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –    शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकेल या दृष्टीनं आतापासूनच तयारीला लागा असे आदेश पक्षांच्या जिल्हाप्रमुखांना दिले आहेत अशी माहिती आहे. शिवसेना जिल्हाप्रखुमांसोबत काल रात्री उशीरा बैठक पार पडली. व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे घेण्यात आलेली ही बैठक तब्बल 3 तास सुरू होती.

सीएम उद्धव ठाकरे यांनी काल रात्री व्हिडीओ कॉन्फरंसच्या माध्यमातून जिल्हाप्रमुखांशी (District Head) संवाद साधला. रात्री 10 वाजता सुरू झालेली ही बैठक मध्यरात्री 1 वाजेपर्यंत चालली. यावेळी दसरा मेळाव्यात मांडलेल्या भूमिकेबद्दल शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी उद्धव ठाकरे यांचं जोरदार अभिनंदन केलं.

यंदा कोव्हिडच्या (Covid-19) काळात राज्य सरकारकडं निधीची कमतरता असली तरी पुढच्या वर्षी जिल्ह्यांना विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिलं.

सीएम ठाकरेंनी सांगितलं की, कोव्हिडच्या काळात सरकार आपलं काम करत आहे. परंतु पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा अशा सूचनाही त्यांनी जिल्हाप्रमुखांना दिल्या. टीकाकारांना टीका करू द्या तुम्ही तुमचं कम करत रहा असा सल्लाही ठाकरे यांनी यावेळी दिला.

You might also like