CM Uddhav Thackeray | शिवसेना-भाजपमध्ये शाब्दिक राडा; मुद्द्यावरून थेट गुद्द्याची भाषा

मुंबई/नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – CM Uddhav Thackeray | भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांनी शिवसेना भवन (shivsena bhavan) फोडण्याची भाषा केल्यानंतर गेल्या दोन दिवसापासून शिवसेना आणि भाजपमध्ये (Shivsena vs BJP) शाब्दिक राड्याचे स्वरूप आले आहे. रविवारी एका जाहीर कार्यक्रमात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आम्हाला थप्पड मारण्याची धमकी देऊ नका. अशी एक झापड देऊ की पुन्हा कधी उठणार नाही, अशा शब्दात प्रत्युत्तर दिले. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही आणि आलं तर सोडत नाही, अशी आव्हानाची भाषा वापरली.

वरळी येथे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या (BDD Chaal Redevelopment Project Worli)भूमिपूजन सोहळ्यात शिवसेनेचा इथंवरचा प्रवास थपडा घेत आणि देतच झाला आहे. जितक्या थपडा खाल्ल्या त्याच्या दामदुप्पट दिल्या आहेत आणि याच्यापुढेसुद्धा देऊ, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला. शिवसेनेच्या रक्तातच लढवय्येपणाचा गुण आहे. इथे भाषणात साधा विषय काढला तर घोषणा आल्या, आवाज घुमला. त्यामुळे थपडा किंवा धमकीची भाषा कोणी करू नये, असे ठाकरे म्हणाले. यामुळे आता मुद्द्यांवरची चर्चा थेट गुद्द्यांवर आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी अशी भाषा करणे दुर्दैवी – दरेकर

मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) म्हणाले, उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख जरी असले तरी ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. विरोधकांनी टीका केली असली तरी मुख्यमंत्र्यांकडून थप्पडबाजीची भाषा होणे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी अशी भाषा वापरणे यापेक्षा महाराष्ट्रासाठी दुर्दैवी काही नसल्याचे म्हटले आहे.

नशामुक्ती कार्यक्रम घेणे गरजेचे: संजय राऊत

आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भाष्य करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी यावर आमचे शाखाप्रमुखच बोलतील असे म्हंटले. त्यानंतर त्यांनी ट्वीट करत महाराष्ट्रात तातडीने नशामुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाड्यांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही. (समझनेवालोंको इशारा काफी है) मराठी अस्मितेचे शिवसेना भवन हे ज्वलंत प्रतीक आहे. बाटग्यांना हे कसे समजणार असे त्यांनी म्हटले.

तुमचे काय-काय फोडू ते पाहाच ! – गुलाबराव पाटील

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनीही प्रसाद लाड यांना आव्हान देत त्यांनी आम्हाला सेना भवन फोडण्याची तारीख कळवावी आणि फोडण्याची हिंमत दाखवावी. त्यानंतर आम्ही त्यांचे काय-काय फोडू शकतो, हे त्यांना लक्षात आणून देऊ, असा इशारा दिला. त्याचबरोबर राज्यात सत्तांतर होईल असे भाजपला वाटले, परंतु तसे होत नसल्याने काही तरी करून वातावरण तापवण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरु आहे, असेही पाटील म्हणाले.

माझ्यासाठी विषय संपला – प्रसाद लाड

आमदार प्रसाद लाड यांनी रविवारीही माझ्या विधानांचा विपर्यास केला असल्याचे म्हटले.
ते म्हणाले, बाळासाहेबांना आम्ही दैवत मानतो.
शिवसेना भवनाबद्दल बोलणे हे चुकीचेच झाले.
कालच मी व्हिडीओद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे.
त्यामुळे हा विषय माझ्यासाठी संपला आहे, असे त्यांनी म्हंटले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : CM Uddhav Thackeray | war words between shiv sena and bjp intensified challenge each other

Pimpri Crime | ‘मी बाहेर आल्यावर सोडणार नाही, पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस चौकीत धमकी’

Mumbai High Court | उच्च न्यायालयाची ठाकरे सरकारला सूचना; ‘लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या’

Pooja chavan Suicide Case | पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला महत्त्वाचा पुरावा, संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ?

Mumbai Local | वकिलांचा फ्रंट लाईन वर्करमध्ये समावेश, वकिलांना लोकल प्रवासाची मुभा; राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे दर