निजामुद्दीनसारखे प्रकरण महाराष्ट्रात खपवून घेणार नाही, CM उद्धव ठाकरे

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –   देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना दिल्लीतील निजामुद्दीन येथे जे मरकज येथे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निजामुद्दीनसारखे प्रकरण राज्यात खपवून घेणार नाही. कोणत्याही जाती धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाहीत याची खबरदारी घ्या, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दिल्लीत झालेल्या मरकजमधील कार्यक्रमातील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

या कार्यक्रमासाठी देशातील विविध भागातील आणि परदेशातील नागरिक उपस्थित होते. महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करोना उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी त्यांनी मरकज येथील कार्यक्रमात भाग घेतलेल्यांनी तातडीने पुढे येऊन आपली तपासणी करून सहकार्य करावे असे आवाहन केले.

या घटनेनंतर निजामुद्दीनमधील मरकज बंद करण्यात आला आहे. हे ठिकाण दिल्लीतल्या कोरोना प्रादुर्भावाचं सगळ्यात मोठं केंद्र बनले आहे. आणि महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.