CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेला संबोधित करणार, काय घोषणा करणार याकडे राज्याचे लक्ष

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाची दुसरी लाट (Corona Virus) ओसरल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु पुणे (Pune) आणि काही जिल्ह्यात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) निर्बंध शिथिल करण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (रविवार) रात्री 8 वाजता सोशल मीडियावरुन (Social media) राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. राज्यातील निर्बंध शिथिल करण्याची शक्यता आहे. तसचं मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल (Mumbai Local) सेवा दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांसाठी सुरु करण्याची शक्यता आहे. तसेच रेस्टॉरंट सुरु ठेवण्याच्या वेळेत वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबईतील मॉल पुन्हा एकदा सुरु होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबई, ठाण्यासह 25 जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
तर 11 जिल्ह्यांतील निर्बंध कायम ठेवले आहेत. जास्त रुग्णसंख्या असलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, अहमदपूर आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश असून या ठिकाणी निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे आज कोणते नियम शिथिल केले जाणार, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Web Title :- cm uddhav thackeray will interact with the people at 8 pm the possibility of a big announcement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Branch Police | तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणारा सराईत आरोपी गजाआड

PF Account | पीएफचे पैसे काढायचे असतील तर लवकर करा ‘हे’ काम, अन्यथा अडकतील सर्व पैसे !

Voltro Motors | केवळ 4 रुपयात करा 100 कि.मी.चा प्रवास, जाणून घ्या Voltro इलेक्ट्रिक सायकलबाबत