सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पहिल्यांदाच बोलले अन् फडणवीसांना सुनावले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. मात्र, अजूनही सुशांतच्या आत्महत्येचं कारण समोर आलं नाही. काही जणांनी सुशांतची हत्या केल्याचं सांगत चौकशीची मागणी केली आहे. तर यावरुन बिहार आणि महाराष्ट्र पोलिंसाच्या मध्ये आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकणारवरुन पहिल्यादांच प्रतिक्रिया देत भाजपला फटकारलं आहे.

“सुशांत सिंह प्रकरणी मुंबई पोलिसांचा योग्य दिशेने तपास सुरु आहे. मुंबई पोलीस हे कार्यक्षम आहेत. यासंदर्भात कोणाकडे काही ठोस पुरावे असतील तर ते पोलिसांकडे सादर करावेत. त्यात तथ्य आढळल्यास जो कोणी दोषी असेल त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. सुशांतच्या चाहत्यांनी महाराष्ट्र सरकारवर विश्वास ठेवावा. तसेच या प्रकरणाचा वापर महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांत वाद निर्माण करण्यासाठी करु नका’ असे म्हणत राजकारण करणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी सुनावलं आहे.

…तर ईडी गुन्हा दाखल करु शकते – देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर ट्विट केलं होत. “सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी लोकभावना आहे. पण राज्य सरकारची तशी इच्छा दिसत नाही. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराची एक बाजू समोर आली आहे. त्यामुळे ईडी गुन्हा दाखल करु शकते” असं फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री यांनी याप्रकरणी राजकारण करु नये अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी “या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला जाणार नाही कारण तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम असल्याचं” स्पष्टीकरण दिल होतं.

सुब्रमण्यम स्वामींची सीबीआय चौकशीची मागणी

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी सातत्याने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी करत आहेत. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याचा खून करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी ट्विट करत सुशांतचा खून का झाला असावा याबद्दल 26 मुद्दे मांडले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like