मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला BMCकडून ‘डीफाल्टर’ घोषित, इतर मंत्री देखील ‘थकबाकीदार’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सामान्य माणसाचे पाण्याचे बिल थकल्यास तात्काळ कारवाई करणारे प्रशासन राजकारणी आणि बड्या अधिकाऱ्यांवर मात्र मेहेरबान होताना दिसत असतात. अनेकदा नळ काढून नागरिकांचे पाणी देखील बंद केले होते. मात्र लाखो रुपयांचं पाणीबिल थकल्यानंतर देखील शासकीय निवासस्थान आणि मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोणत्याही प्रकारची करावाई केली जात नसल्याची माहिती अधिकारातून उघड झाली आहे.

अशाच प्रकारे मुख्यमंत्र्यांचे  शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्याचं पाणीबिल थकले  असले तरी महापालिकेने आतापर्यंत त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. वर्षा बंगल्याचं  सुमारे ७ लाख ४४ हजार ९८१ रुपयांच पाणी बिल थकलं आहे. मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाची पाण्याची एकूण ८ कोटी रुपये थकले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांवर तात्काळ कारवाई करणारे हे प्रशासन यांच्याबाबतीत इतके उदार का ?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुंबईतील आरटीआय  कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेकडून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती मागावली होती. त्यात हि माहिती उजेडात आली आहे. त्यानंतर आता महापालिकेने वर्षा बंगल्याला डिफॉल्टर घोषित केले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री कार्यालयातून यावर काय उत्तर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पाणीबिल थकबाकी आणि मंत्र्यांची निवासस्थाने

देवेंद्र फडणवीस : मुख्यमंत्री, वर्षा निवासस्थान
एकूण थकबाकी – ७ लाख ४४ हजार ९८१ रुपये

सुधीर मुनगंटीवार : वित्तमंत्री, देवगिरी निवासस्थान
एकूण थकबाकी -१ लाख ४५ हजार ५५ रुपये

विनोद तावडे :  शालेय शिक्षणमंत्री, सेवासदन निवासस्थान
एकूण थकबाकी – १ लाख ६१ हजार ७१९ रुपये

पंकजा मुंडे: महिला व बालविकास मंत्री, रॉयलस्टोन निवासस्थान
एकूण थकबाकी – ३५ हजार ३३ रुपये

दिवाकर रावते : परिवहन मंत्री, मेघदूत निवासस्थान
एकूण थकबाकी – १ लाख ५ हजार ४८४ रुपये

सुभाष देसाई : उद्योगमंत्री, पुरातन निवासस्थान
एकूण थकबाकी – २ लाख ४९ हजार २४३ रुपये

एकनाथ शिंदे: सार्वजनिक बांधकाम, नंदनवन
एकूण थकबाकी – २ लाख २८ हजार ४२४ रुपये

चंद्रशेखर बावनकुळे: ऊर्जामंत्री, जेतवन
एकूण थकबाकी – ६ लाख १४ हजार ८५४ रुपये

महादेव जानकर: पशुसंवर्धन मंत्री, मुक्तागिरी
एकूण थकबाकी – १ लाख ७३ हजार ४९७ रुपये

ज्ञानेश्वरी निवासस्थान
एकूण थकबाकी – ५९ रुपये ७७८ रुपये

सह्याद्री अतिथीगृह
एकूण थकबाकी -१२ लाख ४ हजार ३९० रुपये

आरोग्य विषयक वृत्त – 

धक्कादायक ! भारतीयांचं वयोमान वायू प्रदूषणामुळे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांनी झाले कमी

‘या’ कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच

यामुळे कारणांमुळें वाढत महिलांचं वजन

फिट राहण्यासाठी दीपिकाचा नवीन फंडा

Loading...
You might also like