वडिलांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहणार नाहीत CM योगी, एम्स दिल्लीमध्येच घेणार अंतिम दर्शन

पोलिसनामा ऑनलाईन – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंदसिंह बिष्ट यांचे आज पहाटे निधन झाले. परंतु देशभरात असलेल्या लॉकडाऊन मुळे ते अंत्यविधीत सहभागी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊन नंतर होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वडिलांच्या निधनानंतर त्यांनी एक पत्र देखील लिहिले त्यात त्यांनी त्यांच्या भावनांना वाट करून दिली . वडिलांच्या संस्कारामुळे आपण घडल्याचे त्यांनी पात्रात नमूद केले. शेवटच्या क्षणी त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता येत नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. तसेच वडिलांच्या अंत्यविधीला लोकांनी गर्दी न करण्याच्या सूचना देखील आदित्यनाथ यांनी दिल्या.