CM योगी यांचे वडील पंचतत्वात विलीन, मुख्यमंत्र्यांनी अशी वाहिली श्रद्धांजली

लखनौ : वृत्त संस्था – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या सामाजिक कर्तव्याबरोबर मुलाचे कर्तव्य देखील पार पाडले आहे. त्यांचे वडील आनंद सिंह बिष्त यांचे दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले. त्यांनतर त्यांच्यावरती आज ऋषिकेश येथी गंगा आणि हेवल नदीच्या संगमावरील फुल चट्टी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या मोठ्या मुलाने मानेंद्र सिंह बिष्त यांनी त्यांना मुखाग्नी दिली. त्यावेळेस त्यांची मुले शैलेंद्र सिंह आणि महेंद्र सिंह यांच्यासह संपूर्ण कुटुंब आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी आपल्या निवासस्थानी कोरोना संसर्गा संदर्भात कोअर टीमची बैठक घेतली. बैठकीपूर्वी योगी आदित्यनाथ यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या वडिलांना दोन मिनिटे मौन धारण करून श्रद्धांजली वाहिली. वडिलांना दोन मिनिटांची श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी बैठकीला सुरुवात केली. यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना नागरी सेवा दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या. तसेच एका योग्याची भूमिका पार पाडत ते कोरोना संसर्गाला राज्यातून हद्दपार करण्यासाठी कामाला देखील लागले.

आईस लिहले भावनिक पत्र –

योगी आदित्यनाथ यांनी लिहलेल्या या पत्रात म्हटलं आहे की, ‘पूजनीय वडिलांच्या जाण्याने मला अत्यंत दु:ख झाले आहे. ते माझे जन्मदाता आहेत. आयुष्यात प्रामानिकपणा, कठोर परिश्रम आणि निस्वार्थ तसेच समर्पण भावाने लोक कल्यानाचे कार्य करण्याची शिकवन त्यांनी बालपणी मला दिली. अखेरच्या क्षणी त्यांचे दर्शन घेण्याची अत्यंत इच्छा होती. मात्र, जागतीक महामारी कोरोना संसर्गाविरुद्ध देश लढत आहे. त्यात उत्तर प्रदेशच्या २३ कोटी जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे.

मी अखेरचे दर्शन घेऊ शकलो नाही. लॉकडाऊन यशस्वी करणे आणि कोरोना संसर्गाचा पराभव करण्याच्या योजनेमुळे मला अंत्यविधीला येणे शक्य होणार नाही. पूजनीय आई आणि पूर्वाश्रमीच्या सर्व सदस्यांना विनंती करतो, की लॉकडाऊनचे पालन करून कमीत कमी लोकांनी अंत्यविधी पार पाडावा. पूजनीय वडिलांच्या स्मृतीस कोटी-कोटी प्रणाम करत त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. लॉकडाऊन नंतर दर्शनासाठी येईन.’