देशातील आर्थिक मंदीसाठी ‘मुघल’ आणि ‘इंग्रज’ जबाबदार, मुख्यमंत्र्यांचा जावईशोध (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ब्रिटिशांनी आणि मुघलांनी भारतावर हल्ले केल्याने भारतात आर्थिक मंदी आल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरममध्ये (डब्ल्यूएचईएफ) बोलत होते.

या फोरममध्ये बोलताना त्यांनी म्हटले कि, इंग्रज भारतात येण्याआधी भारताचा जागतिक व्यापारात हिस्सा हा 36 टक्के होता, मात्र त्यानंतर तो 20 टक्के झाल्याचे मत त्यांनी या फोरममध्ये व्यक्त केले. तसेच मुघल आणि इंग्रजांमुळेच भारताची अर्थव्यवस्था खालावल्याने त्यांनी म्हटले. इंग्रजांना महान समजणाऱ्या सरकारच्या कालखंडात विकास दर हा केवळ 4 टक्के होता.

नरेंद्र मोदींच्या कालखंडात तो मोठ्या प्रमाणात वाढल्याचे देखील त्यांनी या फोरममध्ये म्हटले. उत्तरप्रदेशविषयी देखील त्यांनी आपली भूमिका मांडली. उत्तर प्रदेशने आपल्या कालखंडात मोठा विकास केला असून शेती आणि उदयॊगामध्ये आणि पर्यटन विभागात आम्ही मोठा विकास केल्याचे त्यांनी म्हटले. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याचा दावा देखील त्यांनी या फोरममध्ये केला आहे. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी भारताच्या एकतेवर भाष्य करताना म्हटले कि, आम्ही एका राष्ट्राबद्दल बोलले तर अनेकांनी याला बहुराष्ट्र म्हटले. तर अनेकांनी एकसंघतेऐवजी यामध्ये विविधता शोधण्याचा प्रयत्न केला, असे देखील त्यांनी म्हटले.

दरम्यान, उत्तरप्रदेशमधील हिंसेविषयी बोलताना ते म्हणाले कि, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशमध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा झाली नाही. राज्यात अनेक आव्हाने असून आम्ही यासाठी कटिबद्ध आहोत. याआधी राज्यात मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होता. मात्र आता आमच्या सरकारच्या कालखंडात यामध्ये मोठा बदल झाला असून अनेक प्रश्नांवर काम करण्याचे बाकी असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Visit : Policenama.com