Delhi 2020राजकीय

केजरीवाल ‘असामाजिक’ आणि भारत ‘विरोधी’ तत्वांच्या हातातील ‘खेळणं’ बनलेत : CM योगी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत राजकीय वातावरण भलतेच तापले आहे. भाजप-आपमध्ये शाब्दिक वादंग सुरु आहे. भाजपकडून ‘आप’ला घेरण्याच्या प्रयत्नाला जोर आला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी आरोप केला की अरविंद केजरीवाल असामाजिक आणि भारत विरोधी तत्वांच्या हातचे खेळणे झाले आहेत.

पश्चिम दिल्लीच्या विकासपुरीमध्ये एका रॅलीमध्ये संबोधित करताना आदित्यनाथ म्हणाले की केजरीवाल यांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या मुद्यावर विचार करण्यात रस नाही, तर त्यांना सीसीए विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचे केंद्र बनलेल्या शाहीन बागची चिंता आहे. पश्चिम दिल्लीच्या उत्तम नगर मध्ये एका रॅलीत ते म्हणाले की मागील 5 वर्षांपासून केजरीवाल दिल्लीतील लोकाच्या भावनांशी खेळत आहे.

आदित्यनाथ म्हणाले की, केजरीवाल यांनी दिल्लीचा विकास बाधित केला आहे. नकळत ते असामाजिक आणि भारत विरोधी तत्वांच्या हातचे खेळणे झाले आहेत. जेएनयूमध्ये देश विरोधी नारेबाजी करणाऱ्यांबाबत सहानुभती दर्शवणाऱ्या केजरीवाल यांच्यावर त्यांनी टीका केली.

Back to top button