धक्कादायक ! 10 राज्यात सर्वाधिक बेरोजगारी, त्यापैकी 6 भाजप शासित, अहवालातील खुलासा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून मोठ्या प्रमाणात युवक बेरोजगार आहेत. नुकताच 10 राज्यांचा रिपोर्ट बाहेर आला असून यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे 10 पैकी 6 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. नुकतेच सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनमीने बेरोजगारी संदर्भात काही आकडेवारी जाहीर केली होती. त्यानुसार त्रिपुरामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी आहे.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, हरियाणा, हिमाचल, झारखंड बिहार, उत्तर प्रदेश या भाजपशासित राज्यांमध्ये सर्वात जास्त बेरोजगारी आहे. आकडेवारीनुसार या राज्यांमध्ये 31.2 % बेरोजगारी आहे. तर दिल्लीमध्ये 20.0 टक्के, हरियाणात 20.3 टक्के बेरोजगारी आहे. सर्वात जास्त बेरोजगारी हि हिमाचल प्रदेशमध्ये असून या ठिकाणी 15.6 टक्के, पंजाबमध्ये 11.1 टक्के,  झारखंड 10.09 टक्के, बिहार 10.3 टक्के, छत्तीसगढ 8.6 टक्के तर यूपीमध्ये 8.2 टक्के बेरोजगारी दर आहे. कर्नाटकमध्ये 3.3टक्के, तामिळनाडूमध्ये 1.8 बेरोजगारी दर आहे.

दरम्यान, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होत असून दोन्ही ठिकाणी भाजप सत्तेमध्ये आहे. सध्या महाराष्ट्रात बेरोजगारी दर 5.7 असून याचा निवडणुकीवर किती परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Visit : Policenama.com