‘त्या’ घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने मुख्यमंत्री योगी घेणार आधिकाऱ्यांचा ‘क्लास’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – उत्तर प्रदेशात महिलांवर वाढणाऱ्या अत्याचारांच्या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर करवाईचा इशारा दिला आहे. त्यासाठी पाऊल उचलत योगी सरकारने महिल्यांचा सुरक्षेच्या मुद्यावर बैठक बोलावली आहे. या बैठकी चीफ सेक्रेटरी, प्रमुख सचिव गृह, डीजीपी, एडीजी लॉ एंड ऑर्डर यांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी अलीगढ येथे झालेल्या मुद्यावर आधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर योगी अलीगढच्या आमदारांची देखील भेट घेणार आहेत.

सध्या योगी आदित्यनाथ विविध मुद्यावर बैठका घेत आहेत आणि प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचे आदेश देत आहेत. त्यांनी ३ जूनला घेतलेल्या बैठकीत सरकारी योजनाची तपासणी करत सांगितले की प्रयागराज कुंभ मेळाव्यात ज्याप्रकारे स्वच्छता ठेवण्यात आली होती त्याच धरतीवर सगळ्या महानगरपालिकांमध्ये स्वच्छता ठेवण्यात यावी. ते म्हणाले की लोकांच्या सहभागातून हे काम उत्तम होऊ शकते. सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेची कामे नीट होत आहे की नाही याची देखील तपासणी करावी.

योगींनी सांगितले की आजच्या बैठकीतील एजेंडा प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत शौचालय निर्माण, सौभाग्य योजना, निराधार, विधवा आणि दिव्यांगासाठी पेंशन यासारख्या योजनांवर चर्चा करणे असणार आहे.

मुख्यमंत्री योगी यांनी आदेश दिला आहे की, मंडळ आयुक्त 10 जून पर्यंत यावर आवाहल तयार करतील आणि 11 जून ते 15 जून पर्यंत प्रमुख सचिव, अप्पर मुख्य सचिव आणि मंत्री स्तरावर पुढील समीक्षा करण्यात येईल. 16 जून ते 15 जुलै पर्यत योगी यावर समीक्षा बैठक घेतील. या बैठकीत महिला सुरक्षेवर देखील चर्चा करण्यात येणार असून काय उपाय योजना राबवता येतील यावर चर्चा करण्यात येणार आहे.