CNG-PNG Prices | सर्वसामान्यांना पुन्हा बसणार झटका ! पुढील महिन्यात 10-11 % वाढू शकतात CNG चे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था CNG-PNG Prices | सामान्य माणसांना ऑक्टोबरमध्ये मोठा झटका बसू शकतो. दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरात सीएनजी आणि पीएनजी (CNG-PNG Prices) चे दर ऑक्टोबरमध्ये 10-11 टक्केपर्यंत वाढू शकतात. ब्रोकरेज कंपनी आयसीआयसीआय सिक्युरिटीज (ICICI Securities) च्या एका रिपोर्टमध्ये असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सरकारद्वारे निर्धारित गॅसचे दर सुमारे 76 टक्के वाढणार आहेत, ज्याचा परिणाम सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीवर सुद्धा पडणार आहे.

सरकार गॅस सरप्लस देशांच्या दरांचा वापर करते. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या ओएनजीसी सारख्या कंपन्यांना नामांकनाच्या आधारावर दिलेल्या क्षेत्रांसाठी नैसर्गिक गॅसच्या किमतीचा सरकार दर
सहा महिन्यांनी आढावा घेते. पुढील आढावा एक ऑक्टोबरला होणार आहे.

3.15 डॉलर प्रति युनिट होईल अडमिनिस्टर्ड रेट

आयसीआयसीआय सिक्युरिटीजने म्हटले की, एक ऑक्टोबर 2021 पासून 31 मार्च, 2022 पर्यंत एपीएम किंवा अ‍ॅडमिनिस्टर्ड रेट (Administered Rate) वाढून 3.15 डॉलर प्रति युनिट (MMTTU) होईल.
तो सध्या 1.79 डॉलर प्रति युनिट आहे.

रिपोर्ट सांगतो की, एपीएम गॅस किमतीमध्ये वाढ सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन (CGD) कंपन्यांसाठी आव्हान असेल. म्हणजे त्यांच्यासाठी सीएनजी आणि पीएनजीचा उत्पादन खर्च वाढेल.
शहर गॅस वितरण कंपन्यांना किमतीत 10-11 टक्केची वाढ करावी लागेल.

 

Web Title : CNG-PNG Prices | cng and png prices in delhi mumbai may rise 10 11 percent in october

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

TV Actor Death | धक्कादायक ! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू, ‘या’ अवस्थेत मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ

Saki Naka Rape Case | ही घटना दुर्दैवी; साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास 1 महिन्यात – CP हेमंत नगराळे

Gujarat CM | गुजरातचे नवे ‘CM’ कोण?, चंद्रकांत पाटील की नितीन पटेल? चर्चेला उधाण