CNG-PNG Rates Reduces | पुणेकरांना दिलासा! सीएनजी 6 रुपयांनी तर पीएनजीच्या किंमती 5.70 रुपयांनी स्वस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – CNG-PNG Rates Reduces | पुणे (Pune) व पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad), चाकण (Chakan), तळेगाव (Talegaon) आणि हिंजवडी ( Hinjewadi) परिसरातील सीएनजीच्या दरामध्ये शुक्रवारी (दि.6) मध्यरात्रीपासून 6 रूपयांनी कपात करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल -MNGL) ने घेतला आहे. त्यामुळे पुण्यात आता वाहन चालकांना एक किलो सीएनजी साठी 86 रूपये मोजावे लागणार आहेत. सीएनजीचे दर 6 रुपयांनी कमी झाल्यामुळे रिक्षा चालकांसह सीएनजी चारचाकीच्या मालकांना दिलासा मिळाला आहे. (CNG-PNG Rates Reduces)

 

सीएनजी गॅसची मागणी वाढत आहे. पण, स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग झाल्यामुळे सीएनजीच्या दरात सतत वाढ होत होती. मात्र आता घरगुती नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात घट झाल्यामुळे MNGL नैसर्गिक वायूच्या किमतीत घट करण्याचा निर्णय घेतला आहे. MNGL ने दर कमी केल्यानंतर सीएनजीचे दर पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अनुक्रमे 50 आणि 29 टक्क्यांनी कमी आहेत.  (CNG-PNG Rates Reduces)

 

किती असेल सीएनजी पीएनजीचा नवा दर?
महानगर गॅसच्या या निर्णयामुळे पुणे आणि आसपासच्या शहरात सीएनजीच्या किंमती कमी होत आहेत.
शुक्रवारी मध्यरात्रीपासून, म्हणजेज ८ एप्रिलपासून महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून वितरीत होणाऱ्या
सीएनजीचा दर प्रति किलो 86 रुपये इतका असेल. तर, पीएनजीचा दर 51.30 रुपये प्रति एससीएम (SCM) इतका असणार आहे.

 

 

Web Title :- CNG-PNG Rates Reduces | maharashtra natural gas limited reduce its compressed natural gas price by six rupees in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करु नयेत, त्याची सुरुवात चंद्रकांत पाटलांनी स्वत: पासून करावी’, अजित पवारांचा टोला (व्हिडिओ)

Pune Crime News | आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या बुकीला गुन्हे शाखेकडून अटक; पुण्यातील इतर बुकी पोलिसांच्या ‘रडार’वर

Pune Political News | खा. अमोल कोल्हे भाजपात आले तर आढळरावांचं काय? चंद्रकांत पाटलांचं सुचक विधान