CNG Price Hike | मध्यरात्रीपासून CNG, घरगुती पाईपलाईन गॅसच्या दरात मोठी वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पेट्रोल आणि डिझेल दरवाढीपाठोपाठ आता सीएनजी गॅसच्या किमतीत (CNG Price Hike) मध्यरात्रीपासून वाढ होणार आहे. महानगर गॅस लिमिटेड (Mahanagar Gas Limited) या इंधन पुरवठादार कंपनीने मध्यरात्रीपासून मुंबईत सीएनजीच्या किमतीत (CNG Price Hike) प्रति किलो 2.58 रुपये आणि पाईप गॅसच्या दरात प्रति युनिट 0.55 पैसे वाढ करण्यात येणार आहे. या दरवाढीमुळे मुंबईतील लाखो रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

या कारणामुळे दरवाढ
गॅस पाइप लाईन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्याने परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्चाचे नियोजन करण्यासाठी ही दरवाढ करण्यात येणार आहे, असे महानगर गॅस लिमिटेडने (MGL) स्पष्ट केले आहे. यानुसार आज मध्यरात्रीपासून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) मध्ये 2.58 प्रति किलो आणि पीएनजी (PNG) गॅसच्या किमतीत 0.55 पैसे प्रति युनिटने वाढ केली जाणार आहे. हे दर बुधवारी (दि.14) सकाळपासून लागू होतील.

नव्या दरवाढीनंतर सुधारित किंमती
नव्या दरवाढीनुसार मुंबई आणि आसपासच्या सीएनजी, घरगुती पीएनजीच्या सुधारीत किंमती या 51.98 प्रति किलोग्रॅम आणि 30.40/एससीएम (स्लॅब) आणि 36.00/एससीएम (स्लॅब 2) अशा होणार आहेत. अंतरानुसार यामध्ये कमी जास्त फरक असणार आहे. मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडरच्या तुलनेत पीएनजीचे दर 35 टक्क्यांनी कमी असणार आहेत.

Web Titel :- cng price hike big increase price cng domestic pipeline gas midnight

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lightning | वीज कोसळल्याने देशात 78 लोकांचा गेला बळी; पीएम मोदींनी केली आर्थिक मदतीची घोषणा

Smartphone | जर तुमची मुले सुद्धा जास्त मोबाइल पहात असतील तर ‘या’ 6 टिप्सचा करा वापर, जाणून घ्या

Thane Crime News | धक्कादायक ! चक्क रक्ताचा टिळा लावून केला प्रेमाचा बनाव, विवाहित तरूणाचे युवतीवर लैंगिक अत्याचार