CNG Price Hike In Pune | सीएनजीच्या दरात पुन्हा भाववाढ; 15 दिवसात 13 रुपयांची वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – CNG Price Hike In Pune | राज्य शासनाने व्हॅटच्या (VAT) दरात कपात केल्याने CNG १ एप्रिलपासून ६ रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र, हा दिलासा केवळ ५ दिवस टिकला. कंपनीने एका पाठोपाठ भाववाढ केल्याने केवळ १५ दिवसात १३.२० रुपयांची वाढ झाली आहे.

 

कंपनीने आज पुन्हा एकदा किलोमागे २ रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे आता सीएनजीचा दर ७५ रुपये प्रति किलो झाला आहे. शहरातील जवळपास सर्व रिक्षा, पीएमपी बसगाड्या या सीएनजी किंवा PNG वर चालतात (CNG Price Hike In Pune). पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ (Petrol Diesel Price Hike) होत असतानाच सीएनजीच्या दरात वाढ होत नसल्याने सुरुवातीला व्यावसायिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता सीएनजीच्या दरातही वाढ होत आहे. आधीच महागाईने कळस गाठला असताना सीएनजीच्या दरवाढीमुळे रिक्षाचालकांना (Auto Rickshaw Driver) घर चालविणे मुश्कील होऊ लागले आहे.

 

Web Title :- CNG Price Hike In Pune | CNG prices rise again An increase of Rs 13 in 15 days


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा