CNG Price Hike In Pune- Pimpri | पुणे व पिंपरी चिंचवडमधील सीएनजीच्या दरात वाढ, मध्यरात्रीपासून नवीन दर लागू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे (Pune) व पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) सीएनजीच्या दरामध्ये दोन रुपयांनी वाढ (CNG Price Hike In Pune- Pimpri ) करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड Maharashtra Natural Gas Limited (MNGL) ने घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांना बुधवारी (दि.8) मध्यरात्रीनंतर एक किलो सीएनजीसाठी 82 रुपये मोजावे लागणार आहेत. मागील काही महिन्यात सीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ (CNG Price Hike In Pune- Pimpri) करण्यात आली आहे.

 

सीएनजी गॅसची सतत मागणी वाढत आहे, मात्र स्थानिक गॅसची (Local Gas) कमतरता आणि आयात गॅस (Imported Gas) महाग झाल्याने सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पुण्यामध्ये एप्रिलमध्ये सीएनजीचा दर 62.20 रुपये होता. त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात तीन वेळा दर वाढ करण्यात आली होती.

 

पुण्यात 28 एप्रिल रोजी मध्यरात्री सीएनजीचा दर 77.20 रुपये झाला. त्यानंतर 20 मे च्या मध्यरात्री यामध्ये दोन रुपयांची पुन्हा वाढ करण्यात आली. आता पुन्हा बुधवारी (दि.8) मध्यरात्रीपासून दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून पुण्यातील वाहन चालकांना सीएनजीसाठी 82 रुपये मोजावे लागणार आहेत.

एमएनजीएलकडून पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण (Chakan), तळेगाव (Talegaon) आणि हिंजवडी (Hinjewadi)
या लगतच्या भागात सीएनजी आणि पीएनजी (PNG) चा पुरवठा केला जातो.
एमएनजीएल चे पुणे परिसरात 108 सीएनजी पंप आहेत.
मुंबई महानगर गॅस लिमिटेडकडून (Mumbai Mahanagar Gas Limited) सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा केला जातो.

 

Web Title :- CNG Price Hike In Pune- Pimpri Chinchwad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rupali Chakankar | खडकवासला ठरणार महाराष्ट्रातील पहिला विधवाप्रथा मुक्त मतदारसंघ ; रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली होणार ठराव मंजूर

 

Maharashtra MLC Elections 2022 | उमेदवारी डावलल्यानंतर विनायक मेटेंचा सवाल; म्हणाले – ‘भाजपने आम्हाला फक्त वापरून घेतलं का?’

 

Pune HSC Students Suicide | पुण्यात 12 वीत नापास झालेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या, आई-वडिलांना बसला मोठा धक्का

 

CM Uddhav Thackeray | ‘ढेकणांना चिरडण्यासाठी तोफ लागत नाही’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला सणसणीत टोला (व्हिडिओ)

 

Pankaja Munde | ‘पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावं’ ! विधानपरिषदेसाठी भाजपने पत्ता कट केल्यानंतर शिवसेना नेत्यांकडून आमंत्रण