CNG Price Hike Pune | सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ ! जाणून घ्या पुण्यातील नवे दर; पेट्रोल, डिझेलपेक्षा अधिक भाववाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन CNG Price Hike Pune | तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा CNG च्या दरात २ रुपये ८० पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता पुण्यात सीएनजीचा दर किलोमागे ८० रुपये झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीबाबत (Petrol Diesel Price Hike) देशभर आंदोलने केली जात आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलपेक्षा गेल्या पावणे दोन महिन्यात सीएनजीमध्ये झालेली वाढ अधिक आहे. गेल्या ५० दिवसात सीएनजीमध्ये तब्बल १७ रुपये ८० पैशांनी वाढ झाली आहे. (CNG Price Hike Pune)

आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सीएनजी गॅसच्या मिश्रणासाठी लागणार्‍या विशिष्ट वायूच्या दरात वाढ झालेल्या कारण ते आठवड्यापूर्वी ६ रुपयांनी सीएनजीचे दर वाढविण्यात आले होते. शनिवारी मध्यरात्री (दि़ २१ मे) पासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो पुन्हा २ रुपये ८० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. (CNG Price Hike Pune)

गेल्या ३ आठवड्यात तब्बल १४ रुपयांनी सीएनजी महाग झाला आहे. त्यामुळे वाहनचालकाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या सततच्या दरवाढीमुळे रिक्षाचालकांचे (Rickshaw Driver) बजेट कोलमडले आहे.

राज्य शासनाने (Maharashtra State Government) १ एप्रिलपासून व्हॅटचा दरात कपात केल्याने सीएनजी ६ रुपये ३० पैशांनी स्वस्त झाला होता. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, हे समाधान केवळ ६ दिवसच टिकले. त्यानंतर कंपन्यांनी एका पाठोपाठ सीएनजीच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली. १ एप्रिल रोजी सीएनजीचा प्रतिकिलो दर ६२.२० रुपये होता. तो आज ८० रुपये झाला आहे. दोन महिन्यांच्या आत सीएनजीमध्ये तब्बल १७ रुपये ८० पैशांनी वाढ झाली आहे. ही पेट्रोल आणि डिझेलमधील भाववाढीपेक्षा अधिक आहे.

Web Title : CNG Price Hike Pune | CNG price hike again! Find out the new rates in Pune; Higher prices than petrol and diesel

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

 

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

 

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर