CNG Price In Maharashtra | सीएनजी वाहनधारकांना दिलासा ! सीएनजी 6.30 आणि पाइप गॅस 3 रूपयांनी स्वस्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CNG Price In Maharashtra | राज्य सरकारने ‘कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस’च्या दरावर (Compressed Natural Gas) आकारला जाणारा कर (VAT) 10 टक्क्यांनी कमी केल्याने सीएनजीच्या दरामध्ये पुण्यात 6 रूपये 30 पैसे तर ‘पाइप नॅचरल गॅस’ (पीएनजी) 3.40 रुपयांनी स्वस्त (CNG Price In Maharashtra) झाला आहे. त्यामुळे आता सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना दिलासा मिळाला आहे.

 

पुण्यात आणि पिंपरी – चिंचवडमध्ये (Pune & Pimpri – Chinchwad) सीएनजी प्रतिकिलो 62.20 रूपयांना मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये (Maharashtra Budget Session) सीएनजीवरील व्हॅट 13.5 टक्क्यांवरून तीन टक्के इतका कमी करण्याची घोषणा केली होती. 1 एप्रिलपासून सीएनजीचे दर कमी झाले आहेत.

 

31 मार्चपर्यंत सीएनजीचा दर 68.50 आणि पीएनजीचा 37.10 परंतु 1 एप्रिलपासून सीएनजी 62.20 आणि पीएनजी 33.70 रूपये झाला आहे. राज्य सरकारने एकीकडे सीएनजीवरील कर घटवला असला तरी दुसरीकडे ‘एमएनजीएल’ने 31 मार्च रोजी ‘सीएनजी’मध्ये अडीच रुपये आणि ‘पीएनजी’मध्ये 1.10 रुपयांनी दरवाढ केली आहे. (CNG Price In Maharashtra)

 

दरम्यान, सीएनजी तयार करण्यासाठी स्थानिक आणि आयात केलेला असे दोन प्रकारचे गॅसची गरज असते.
आयात केलेल्या गॅसची किंमत गेल्या काही दिवसांमध्ये वाढली असून स्थानिक गॅसची कमतरता आहे.
त्यामुळे येत्या काळात सीएनजीचे दर वाढण्याची शक्यता असल्याचं महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक दीपक सावंत (Deepak Sawant, Managing Director, Maharashtra Natural Gas Limited) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- CNG Price In Maharashtra | cng cheaper by six rupees maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा