CNG Price Pune | पेट्रोल डिझेल पाठोपाठ आता CNG त 2 रुपयांनी भाववाढ; जाणून घ्या नवे दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – CNG Price Pune | पेट्रोल, डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असताना तसेच गॅसचे दर महिन्याच्या एक तारखेला वाढले. असे असताना आता सीएनजी गॅसच्या (CNG Price Pune) दरातही तेल कंपन्यांनी वाढ केली आहे.

सीएनजी गॅसच्या दरात सोमवारी किलोमागे तब्बल 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी अनेक महिने हा दर 57.50 रुपये होता. आजपासून हा दर 59.50 रुपये झाला आहे. शहरातील बहुतांश सार्वजनिक वाहतूकीच्या बस, रिक्षा, कॅब तसेच खासगी गाड्या या प्रामुख्याने सीएनजीवर परिवर्तित करण्यात आल्या आहेत. शहरातील सार्वजनिक वाहतूकीसाठीच्या सीएनजीवरील नव्या बस घेतल्या जात आहे. डिझेल दरवाढीचा फटका एस टी व पीएमपीला बसत असतानाच आता सीएनजीत वाढ केल्याने हाही या दोन्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा खर्च वाढणार आहे.

पेट्रोलवरील रिक्षा आता जवळपास बंद झाल्या असून सर्व रिक्षा सीएनजीवर (CNG Price Pune) चालविल्या जातात. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीचा परिणाम रिक्षा वाहतूकीवर आतापर्यंत बसला नव्हता. पण आता तब्बल 2 रुपये वाढ करण्यात आल्याने रिक्षाचालकांच्या व्यवसायावरही परिणाम होणार आहे. परिणामी रिक्षा प्रवास महागण्याची शक्यता आहे.

Web Title :- CNG Price Pune | after Petrol and diesel price CNG hike Rs 2; Learn new rates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shah Rukh Khan | ‘माझा मुलगा ‘ड्रग्ज’ आणि ‘सेक्स’ करू शकतो’, जेव्हा एका मुलाखतीमध्ये घसरली होती शाहरुख खानची जीभ; आता Video Viral

Pune Crime | ‘तू मोठा की मी मोठा’ ! भोरमध्ये पुण्यातील तरुणाचा दगडाने ठेचून खून, नुकताच आला होता कारागृहातून बाहेर

Maharashtra Police | संतापजनक ! मुलाला बोलल्याच्या रागातून पोलीस अधिकाऱ्याची राममंदिराच्या पुजाऱ्याला बेदम मारहाण; शहर आणि परिसरात प्रचंड खळबळ