CNG Price Pune | पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर पण सीएनजीच्या दरात किलो मागे 1.80 पैशांची वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – CNG Price Pune | आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या दराचे कारण करुन दररोज पेट्रोल, डिझेलच्या दरात दरवाढ करणार्‍या तेल कंपन्यांनी मोदी सरकारने अबकारी करात कपात केल्यानंतर गेल्या १५ दिवसात एकदाही वाढ केलेली नाही. असे असताना आता सीएनजीच्या दरात (CNG Price Pune) आज किलोमागे १ रुपया ८० पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

पुणे शहरात यापूर्वी ६२.१० रुपये प्रति किलो दराने सीएनजीची विक्री होत होती. आज त्यात १.८० रुपयांची किलोमागे वाढ करण्यात आली आहे. आता सीएनजीचा दर प्रति किलो ६३.९० रुपये झाला आहे. वाढती महागाई लक्षात घेऊन शहरातील रिक्षांना प्रादेशिक परिवहन विभागाने दोन दिवसांपूर्वी भाडेवाढ मंजूर केली होती. त्यामुळे मेटाकुटीत व्यवसाय करणार्‍या रिक्षाचालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील बहुतांश रिक्षा या सीएनजी व एलपीजीवर चालतात. भाडेवाढीच्या आनंदावर तेल कंपन्यांनी सीएनजीच्या दरात वाढ करुन विरजण टाकले आहे. (CNG Price Pune)

 

Web Title :- CNG Price Pune | Petrol and diesel prices fixed but CNG prices hiked by 1.80 paise per kg

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | ‘तू कोण अधिकारी आहे का?, माझ्या नादी लागलास तर जीवानिशी मारुन टाकीन’ ! पुणे मनपाच्या नगरसेवकाच्या कार्यकर्त्याला ठेकेदाराची मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी

Personal Loan | ‘या’ सरकारी बँकेत सर्वात कमी व्याजदर ! तात्काळ पैशांची रज असेल तर तुम्ही देखील घेऊ शकता ‘कर्ज’; जाणून घ्या 5 लाख रुपयांवर किती द्यावा लागेल EMI

Pune Corporation | पुणे महापालिका सुरू करणार ‘ऑनलाईन अंत्यविधी पास’ची सुविधा ! मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली माहिती