CNG Vs Electric Car | इलेक्ट्रिक कार खरेदी करावी की CNG? जाणून घ्या दोन्ही पैकी कोणती चांगली, कोण-कोणते आहे तोटे

CNG Vs Electric Car | electric buses start run in uttar pradesh ghaziabad yogi adityanath is likely to flag off the bus services CNG Vs Electric Car
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – CNG Vs Electric Car | देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आकाशापर्यंत गेल्या आहेत (CNG Vs Electric Car). यासाठी लोक परवडणार्‍या इंधनाकडे वळत आहेत. यामुळे लोक पेट्रोल-डिझेलऐवजी CNG आणि इलेक्ट्रिक कार खरेदी करणे पसंत करत आहेत (Compare between electric and CNG car).

 

भारतात मागील एक वर्षात इलेक्ट्रिक आणि सीएनजीवर चालणार्‍या कारच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, इलेक्ट्रिक कारची विक्री अजूनही देशातील एकुण वाहनांच्या विक्रीच्या तुलनेत खुप कमी आहे, परंतु यामध्ये मागील वर्षापासून वाढ दिसून येत आहे.

 

पेट्रोल किंवा डिझेल कारच्या तुलनेत सीएनजी कार चालवण्याचा खर्च कमी आहे, तर इलेक्ट्रिक कारची किंमत जास्त आहे. दोघांचे आपआपले फायदे आणि तोटे आहेत. आज आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत सीएनजी कारचे फायदे आणि तोटे सांगणार आहोत. (CNG Vs Electric Car)

 

CNG कारचे फायदे (Advantages of CNG car)

1. पेट्रोल आणि डिझेलवर अवलंबून राहावे लागत नाही.
2. कमी खर्चात तुम्ही सहज प्रवास करू शकता.
3. पेट्रोल आणि इंधनाच्या किमतीच्या तुलनेत सीएनजी स्वस्त.
4. कार निर्माते पेट्रोल-डिझेलवर सीएनजी कार चालवण्याचा पर्याय देखील देतात.

सीएनजी वाहनाचे तोटे (Disadvantages of CNG vehicle)

किफायतशीर असूनही, लोक कमी वापरतात कारण सीएनजी स्टेशनची कमतरता.
काही शहरांत अजूनही सीएनजी स्टेशन नाहीत.
कारमध्ये जास्त वेळ सीएनजी वापरल्याने वाहनाच्या कामगिरीवर परिणाम होतो.
पेट्रोल किंवा डिझेलच्या आऊटपुटच्या तुलनेत सीएनजी कारचे पॉवर आऊटपुट 10 टक्के कमी असू शकते.

 

इलेक्ट्रिक वाहनाचे फायदे (Advantages of electric vehicle)

1. राज्यांनी जाहीर केलेल्या वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहन धोरणांमुळे पेट्रोल-डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहने घेण्यास प्रोत्साहन.
2. काही ठिकाणी, EV खरेदी करण्यासाठी कोणतेही RTO शुल्क किंवा रस्ता कर भरावा लागत नाही.
3. चालवण्यासाठी खूप किफायतशीर. अनेक कारमध्ये एक किलोमीटर गाडी चालवण्याचा खर्च एक रुपयापेक्षाही कमी.
4. इंधनाचा खर्च सीएनजी कारपेक्षा स्वस्त.
5. कारच्या देखभालीचा खर्च खूपच कमी आहे.
6. शून्य उत्सर्जनामुळे इलेक्ट्रिक वाहनांनाही जगभरात पसंती.

 

इलेक्ट्रिक वाहनांचे तोटे (Disadvantages of electric vehicles)

अनेक फायदे असूनही भारतात ईव्हीची मागणी खुप कमी. कारण उच्च किंमत. किंमत सामान्य कारपेक्षा खुपच जास्त आहे.
इलेक्ट्रिक टू-व्हीलर सुद्धा त्यांच्या ICE काऊंटर पार्टच्या तुलनेत खूप महाग आहे.
यातील बॅटरीची किंमत जास्त.
देशात ईव्ही चार्जिंग स्टेशनचा अभाव आहे. चार्जिंग स्टेशन शोधणे कठिण काम.
अनेक ईव्ही एका चार्जवर 400 किमी पेक्षा कमी अंतर देतात जे ईव्ही मालकांसाठी तयारी किंवा इतर इंधन पर्यायांशिवाय लांब ड्राइव्हचा धोका पत्करणे कठीण ठरू शकते.

 

Web Title :- CNG Vs Electric Car | electric buses start run in uttar pradesh ghaziabad yogi adityanath is likely to flag off the bus services CNG Vs Electric Car

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Udayanraje Bhosale | दम असेल तर समोर या…तुम्हाला बघून घेतो, उदयनराजेंनी व्यक्त केला संताप

Diabetes & Egg | डायबिटीजच्या रुग्णांनी अंडे खावे का? जाणून घ्या तत्ज्ञांचा सल्ला

Dasara Melava 2022 | शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील ठाकरेंच्या भाषणावर मनसेची टीका; म्हणाले – ‘विचार ही नाही आणि…’

Total
0
Shares
Related Posts