बॉक्सिंगचं करिअर खराब करण्याची धमकी देत प्रशिक्षकानं केला 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   बॉक्सिंगचे करीअर खराब करेन अशी धमकी देत एका बॉक्सिंग प्रशिक्षकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना चेंबूर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी संबधित प्रशिक्षकाला अटक केली आहे.

याबाबत पीडीत मुलीच्या वडिलांनी टिळकनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी 14 वर्षांची असून तिच्यावर सध्या घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

टिळक नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत 14 वर्षीय अल्पवयीन सदर प्रशिक्षकाच्या क्लासमध्ये बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत होती. अल्पवयीन मुलगी ही अस्वस्थ असल्याने तक्रारदारानी मुलीच्या बॉक्सिंग प्रशिक्षकांना घरी बोलावून मुलीस समजवण्यासाठी सांगितले होते. त्यावेळी आरोपीने मुलीला बाहेर फिरायला घेऊन जातो, असे सांगून एका क्लबमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबत घरी सांगितले तर तूझे बॉक्सिंगचे करिअर खराब करेन अशी धमकी आरोपीने मुलीला दिली. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर प्रशिक्षकाचे बिंग फुटले. पोलिसांनी बुधवारी रात्री टिळकनगर येथून या प्रशिक्षकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.