कारागृहातील कैद्यांच्या बराकीजवळ ‘कोब्रा’, उडाली सर्वांचीच भंबेरी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहात कैद्यांच्या बराकीजवळ कोब्रा जातीचा नाग आढळल्याने खळबळ उडाली. विसापूर जेल येथे कैद्यांचे वास्तव्य असणा-या बराकीजवळ पिंपळाचे झाड आहे. तेथे कारागृहाच्या मध्यभागी कोब्रा जातीचा नाग असल्याचे एका कैद्याने पाहिले. त्यानंतर चांगलीच धावपळ उडाली.

कैद्याने नाग पाहिल्यावर गेटवरील सुरक्षा रक्षकांना ही माहिती दिली. कारागृह अधीक्षक दत्तात्रय गावडे यांनी विसापूर येथील सर्पमित्र अशोक कराळे यांना बोलावून घेतले. कराळे यांनी शिताफीने तो नाग पकडून जेरबंद केला आहे. कराळे यांनी या नागास विसापूर फाट्याजवळील जंगलात मुक्त केले. कारागृह विसापूर जलाशयाच्या कडेला असल्याने धरण पाण्याने भरल्यानंतर कारागृह परिसरात विषारी व बिनविषारी सापांचा वावर नेहमीच वाढतो.

Visit : Policenama.com