Cobra Pose Yoga Benefits | ऑफिसला जाणार्‍यांनी भुजंगासनाचा नक्की करावा सराव, जाणून घ्या काय आहेत त्याचे फायदे?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Cobra Pose Yoga Benefits | नियमितपणे योगाभ्यास (Yoga) केल्याने शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहण्यास मदत होते. दिवसभर बसून राहणे, व्यायामाचा अभाव आणि शारीरिक हालचाली, तेलकट पदार्थ आणि चटपटीत अन्न, ऑफिमध्ये सतत खुर्चीवर बसण्याचे काम यासारख्या गोष्टींमुळे अनेक प्रकारच्या आजारांना आमंत्रण मिळत आहे (Yoga Health Benefits). त्यामुळे नित्यक्रमात योगासनांचा जरूर समावेश करावा (Cobra Pose Yoga Benefits).

 

ऑफिसच्या कामामुळे तुम्हाला एकाच जागी जास्त वेळ बसावं लागतं, यामुळे अशा व्यक्तींमध्ये पाठदुखीसारख्या समस्या असतात. कंबरेच्या बाजूने पाठीत आणि शरीराच्या इतर भागात वेदना होऊ नयेत आणि रक्ताभिसरण टिकवण्यासाठी ऑफिसला जाणार्‍या लोकांनी भुजंगासनाचा नियमित सराव करावा. जाणून घेऊयात काय होऊ शकतात फायदे (Cobra Pose Yoga Benefits) ?

 

भुजंगासन कसे करावे (How To Do Bhujangasana) ? –
योगासनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी त्याचा योग्य आणि दररोज सराव करणं आवश्यक आहे. भुजंगासनाचा सराव करण्याचा योग्य मार्ग जाणून घेण्यासाठी, प्रथम एखाद्या योगतज्ज्ञाचा सल्ला घ्या.

 

या योगाचा सराव करण्यासाठी सर्वप्रथम पोटावर झोपून दोन्ही तळवे मांडीजवळ ठेवावेत. आता आपले दोन्ही हात खांद्याला समान आणा. आपल्या तळहातावर शरीराचे वजन ठेवताना श्वास घ्या आणि डोके वर उचला. डोके मागे खेचताना छातीला पुढे खेचा. काही काळ या स्थितीत रहा आणि नंतर श्वास सोडताना पूर्ववत स्थितीत या.

भुजंगासनाचे लाभ कोणते (What Are The Benefits Of Bhujangasana) ? –
भुजंगासनाचा नियमित सराव हा खुप आरोग्यदायी ठरतो. खांदे, कंबर, कंधे, पाठ आणि मानेच्या समस्या दूर होेतात.
फुफ्फुसाची क्षमता वाढण्यासाठी याचा खुप उपयोग होतो. चिंता आणि नैराश्य याबरोबरच मानसिक स्वास्थ्याचा लाभ या आसनाच्या नियमित सरावाने प्राप्त होतात.
कमरेच्या खालच्या भागातील वेदना कमी होतात. फुफ्फुसाची श्वासोच्छासाची क्षमता वाढते. पाठीच्या मणक्याचा लवचिकपणा वाढतो रक्ताभिसरणही सुरळित होते.

 

या गोष्टी लक्षात ठेवा (Remember These Things) –
भुजंगासन योग अतिशय प्रभावी असून सूर्यनमस्काराचा (Sun Salutation) एक भाग आहे.
तथापि, गर्भधारणा किंवा ऑस्टिओपोरोसिससारख्या काही परिस्थितींमध्ये, हा योग न करण्याचा सल्ला दिला जातो.
आपल्या आरोग्याच्या स्थितीवर आधारित योग्य योग निवडण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Cobra Pose Yoga Benefits | cobra pose yoga benefits in marathi how to get rid of back and spine problems

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Arthritis Causes And Prevention | ‘या’ गोष्टींमुळे संधिवाताच्या वेदना वाढू शकतात, तुम्ही ‘या’ गोष्टींचं अधिक सेवन तर करत नाहीत ना?

 

 Soaked Dry Fruits Benefits | उन्हाळ्यात भिजलेले ड्रायफ्रुट्स खा, जाणून घ्या होणारे फायदे

 

Methods For Removing Wrinkles | वाढत्या वयाबरोबर हातावर सुरकुत्या पडत आहेत, ‘या’ घरगुती उपायांचा अवलंब करा; जाणून घ्या