दर्शनासाठी महादेवाच्या मंदिरात आला ‘कोब्रा’, ‘पिंडी’वरच ठाण मांडलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील एका शिवमंदिरात भाविकांना हैराण करणारा नजारा पाहायला मिळाला. या मंदिरात चक्क एक नाग शंकराच्या पिंडीला वेटोळे घालून बसलेला पाहायला मिळाला. या ठिकाणी या नागाने पिंडीला अशाप्रकारे गुंडाळले होते, जसे शंकराच्या गळ्यामध्ये नाग असतो. मंदिरातील भाविक मात्र या सगळ्या प्रकाराने स्तब्ध झाले होते.

शिव मंदिर में दर्शन करने आया कोबरा, शिवलिंग पर कुंडली मारकर बैठा

या घटनेची माहिती पसरल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हा नजारा पाहण्यासाठी गर्दी केली होती. येथे जमलेल्या भाविकांनी माहिती दिली कि, सुरुवातीला या नागाला हनुमानाच्या मंदिरात पाहण्यात आले होते. त्याठिकाणी देखील तो हनुमानाच्या मूर्तीला वेटोळे घालून बसला होता. त्यानंतर काही वेळातच हा कोब्रा जातीचा नाग शेजारीच असणाऱ्या शंकराच्या मंदिरात गेला आणि त्याने पिंडीची परिक्रमा पूर्ण करून पिंडीवर वेटोळे घालून बसला.

शिव मंदिर में दर्शन करने आया कोबरा, शिवलिंग पर कुंडली मारकर बैठा

दरम्यान, भाविकांनी हा नजारा पाहताच शंकराच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर अनेकांनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करून घेतला.

शिव मंदिर में दर्शन करने आया कोबरा, शिवलिंग पर कुंडली मारकर बैठा

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like