नागोबामुळे पोलीसांची उडाली भंबेरी

बुलढाणा  :  पोलीसनामा ऑनलाईन

पोलिसांना पाहताच गुन्हेगारांची भंबेरी उडते. एरवी भल्या भल्या आरोपींना वठणीवर आणणाऱ्या पोलिसांची नागोबाने चांगली तारांबळ उडवली. बुलढाणा जिल्ह्यातील बोराखेडी पोलीस ठाण्यात नागराज अवतारल्याने पोलिसांची पळापळ झाली. पोलीस ठाण्यात विषारी नाग असल्याची माहिती मिळताच नागाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. एरवी आरोपींवर पाळत ठेवणाऱ्या पोलीसांना सर्पमित्र येईपर्यंत नागावर पाळत ठेवण्याची वेळ आली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1cabfe3e-cfa4-11e8-b6f7-4b6adac65d48′]

बुलढाणा जिल्ह्यातील बोराखेडी पोलीस ठाण्यात नाग निघाल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली. मात्र प्रसंगावधान दाखवत तत्काळ सर्पमित्राला बोलावून नागाला पकडले. त्यामुळे नागोबाच्या अचानक दर्सनाने अॅलर्टवर असलेल्या पोलीसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
बोराखेडी पोलीस ठाण्यात रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक भला मोठा विषारी नाग दिसल्यान्याने तेथील पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. एरवी भल्या भल्या आरोपींना वठणीवर करणारे पोलीस नागाला बघून सैरभैर झाले. शेवटी एका कर्मचाऱ्याने श्रीराम रसाळ या सर्पमित्राला फोन करून बोलावलं. सर्पमित्राने लागलीच पोलीस ठाणे गाठले आणि नागाला पकडून बरणीत बंद केल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला.

#MeToo : पुर्ण चौकशीअंती दोषी आढळणार्‍यांवर कारवाई झालीच पाहीजे

[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1b1f279e-cfa5-11e8-a159-9ff219b01c10′]
पोलीस ठाण्यात विषारी साप निघाल्याची माहिती मिळताच पोलीस ठाण्यातील पोलिसांची चांगलीच भांबेरी उडाली. ज्या ठिकाणी साप निघाला त्या ठिकाणी अंधार असल्याने पोलिसांनी सापावर मोबाईलच्या प्रकाशात नागावर पातळत ठेवावी लागली. सर्पमित्र पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांनी नागाला एका दगडा खालून बाहेर काढले. जवळपास पाच फूट लांब असलेल्या नागाला पाहून पोलिसांनादेखील घाम फुटला. ऐरवी दुसऱ्यांना घाम फोडणाऱ्यांना नागाने पोलिसांनाच घाम फोडल्याची चर्चा परिसरात होती.