उच्चभ्रू तरुणांसाठी आणलेले कोकेन जप्त, ३ नायजेरीयन अटकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या तरुणांसाठी आणलेल्या कोकेनची विक्री करण्यासाठी आलेल्या तीन नायजेरीयन तरुणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पोलिसांनी १५ लाख २० हजार रुपये किंमतीचे १५२ ग्रॅम कोकेन जप्त केले. ही कारवाई मालवणी पोलिसांनाच्या पथकाने केली.

[amazon_link asins=’B0756Z53JN,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5591a098-b105-11e8-bdfa-d78b55907884′]

चुकवू फिलिप्स गॉडवीन( वय ३२), चुकावे मेका डेनियल अजाह (वय २४) आणि मायकल ओगवन्ना कौसी (वय – २२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मालवणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक फटांगरे यांना मालाडच्या मालवणी परिसरात तीन नायझेरियन तस्कर कोकेन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मालवणी येथील राठोडी गावात पोलिस या तस्करांवर साध्या वेशात नजर ठेवून होते. त्यावेळी हे तिघेजण त्या परिसरात अमली पदार्थांच्या तस्करीसाठी आले होते. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना तब्बल 152 ग्रॅम कोकेन मिळून आले ज्याची बाजारात किंमत ही 15 लाख २० हजार रुपये इतकी आहे. हे कोकेन शहरातील उच्चभ्रू वस्तीतील तरुणांसाठी त्यांनी आणल्याची कबूली दिली आहे.

फोनवरून संपर्क करून हे तस्कर त्यांना अमली पदार्थ घेण्यासाठी निर्जनस्थळी बोलवत असल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. या प्रकरणी मालवणी पोलिस अधिक तपास करत आहेत. चुकावे मेका डेनियल अजाह हा मालवणीत राहणार असून अन्य दोन आरोपी हे नायजेरियन असल्याचे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच तस्करांनी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनाच दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विभागाने आता या नायझेरियन तस्करांची धरपकड सुरू केली आहे. मालवणी पोलिसांनी तीन नायझेरियन तस्करांना अटक केली असून त्याच्याजवळून पोलिसांनी सुमारे १५ लाख २० हजार किंमतीचे १५२ ग्रॅम कोकेन हस्तगत केले आहे. मागील पाच महिन्यांत पोलिसांना ११ परदेशी तस्करांना अटक करण्यात यश आलं आहे.

जाहीरात