पुण्यात नायजेरीयन नागरिकाकडून ४९ लाखांचे कोकेन जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका नायजेरीयन नागरिकाला अटक करून ४९ लाख रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले. पुणे पोलिसांनी नायजेरीयन नागरीकाकडून ४८८ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. तसेच आठ लाख रुपयांची रोकड, विदेशी मद्याच्या बाटल्या आणि होंडा सीआरव्ही कार असा एकूण ६३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

फॉलरीन अब्दुल अजिज अन्डोई असे अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या नायजेरीयन नागरिकाचे नाव आहे. पुण्यातील बाणेरमध्ये तो राहत होता. बाणेर-औंध परिसरात तो राहत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

आरोपीला २०१३ मध्ये अंमली पदार्थाची विक्री केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी त्याला चार वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली होती. शिक्षा संपताच त्याने पुन्हा अंमली पदार्थाची विक्रीच्या व्यवसायात सक्रीय झाला होता. पोलीस अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांनी दिली.

‘या’ डायरेक्टरला पहायचाय अभिनेता आयुष्मान खुराणाचा ‘प्रायव्हेट पार्ट’

‘या’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये ‘एन्ट्री’ करणार ‘चिक्कू’ ऋषी कपूर !

‘अ‍ॅसिडिटीचा’ त्रास टाळण्यासाठी हे उपाय करा, होईल फायदा

घरातल्या या मसाल्याने रात्रीतून पिंपल्स होईल गायब …